नक्षलवादी भागातील ‘सीआरपीएफ’च्या 22 जवानांसह एकूण 23 जण कोरोना बाधित

  • सर्वजण बाहेरून आल्यानंतर होते क्वारंटाईन

 विशेष प्रतिनिधी

गडचिरोली : येथील नक्षल भागात सेवेसाठी परजिल्ह्यातून तर काही पर राज्यातून आलेले 23 जण चिनी विषाणूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले.

यात 22 जवान सीआरपीएफ बटालियनचे तर 1 जण भंडारा जिल्हयातील असून हे सर्वजण नोकरीनिमित्त रूजू होण्यासाठी भामरागड येथे आले होते. या सर्वांना जिल्हयात आल्यानंतर क्वारंटाईन केले होते.

सीआरपीएफ जवानांना कृषी महाविद्यालय गडचिरोली येथे तर भामरागड येथील व्यक्तीला भामरागडमध्येच संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. या सर्व रूग्णांना आता जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

सीआरपीएफचे 23 जवान सुटीवर होते ते नागपूरवरून 27 जूनला सीआरपीएफच्या बसने जिल्हयात आल्यानंतर संस्थात्मक विलगीकरणात दाखल झाले. यातील 23 पैकी 18 पॉझिटीव्ह आढळले तर 5 निगेटीव्ह आले. तसेच 4 इतर जवान खाजगी वाहनाने इतर जिल्ह्यातून आले होते. त्यांचेही अहवाल पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

या 23 कोरोनाबाधितांचे ठिकाण व संख्या –
पश्चिम बंगाल -10, उत्तर प्रदेश-2, कर्नाटक -2, ओरीसा-2, झारखंड -1, बिहार -1, अकोला -1, नांदेड -2, चंद्रपूर -1 आणि भंडारा -1

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*