फटाकेबंदी केल्यास ५ लाख जणांचा रोजगार जाईल; करणी सेनेला भीती


पावसाळ्यात हवेत प्रचंड प्रदुषण असते, जास्त आजार असतात आणि मग त्यानंतर दिवाळी सण येतो यामध्ये फटाके फोडले जातात. या फटाक्याच्या प्रचंड आवाजाने आणि फटाक्याच्या तीव्र वासाने हवा,आकाशात आणि जमीनीवरील सूक्ष्म जीव जंतु मेले जातात. त्यामुळे राज्यात लावली गेलेली फटाका बंदी म्हणजे हिंदू धर्म विरोधी कृत्य आहे असे म्हणत करणी सेनेने फटाका बंदीचा निषेध केला आहे.


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : पावसाळ्यात हवेत प्रचंड प्रदुषण असते, जास्त आजार असतात आणि मग त्यानंतर दिवाळी सण येतो यामध्ये फटाके फोडले जातात. या फटाक्याच्या प्रचंड आवाजाने आणि फटाक्याच्या तीव्र वासाने हवा,आकाशात आणि जमीनीवरील सूक्ष्म जीव जंतु मेले जातात. त्यामुळे राज्यात लावली गेलेली फटाका बंदी म्हणजे हिंदू धर्म विरोधी कृत्य आहे असे म्हणत करणी सेनेने फटाका बंदीचा निषेध केला आहे.

राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि दिवाळीच्या पार्श्वभुमीवर फटाकेबंदीचा निर्णय घेण्याच्या विचारात राज्य सरकार आहे. फटाके फोडल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, म्हणून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.

हा निर्णय हिंदू धर्मविरोधी असल्याची भूमिका करणी सेनेकडून घेण्यात आली असून राज्य सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे. चीनी व्हायरसमुळे आधीच सर्वजण संकटात आहेत. त्यात फटाकेबंदी केल्यास ५ लाख जणांचा रोजगार जाईल. ही बंदी म्हणजे विना अभ्यासू, संशोधन न करता केलेली आहे. दिपावलीत फटाके का फोड़तात ? याच महत्व समजुन राज्य सरकारने घ्यावे असे आवाहन त्यांनी केले.

फटाके फोडू नका हे राजेश टोपे यांचे आवाहन अर्थहिन, हिंदू धर्माच्या विरोधात आहे. हिंदू धमार्बाबत गैरसमज निर्माण करण्यासाठी विदेशी धर्म असं करतात. यामुळे संस्कृती नष्ट होते असे करणी सेनेचे अध्यक्ष अजयसिंह सेंगर यांनी म्हटले आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था