कॉंग्रेसची अशीही करणी, गांधीजयंतीच्या पूर्वसंध्येला दारूबंदी उठविण्यासाठी हालचाली

संपूर्ण देशात महात्मा गांधी यांची यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर सुरू असताना कॉंग्रेसचे मंत्री मात्र दारूबंदी उठविण्यासाठी बैठका घेत आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली येथील दारूबंदी उठविण्याची तयारी सुरू आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : संपूर्ण देशात महात्मा गांधी यांची यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा जागर सुरू असताना कॉंग्रेसचे मंत्री मात्र दारूबंदी उठविण्यासाठी बैठका घेत आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली येथील दारूबंदी उठविण्याची तयारी सुरू आहे.

चंद्रपूर व गडचिरोलीतील दारूबंदी उठवण्यासंदर्भात बुधवारी मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. दारूबंदी उठवण्यासाठी एक समिती गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही समिती दीड महिन्यात अहवाल सादर करील, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

बैठकीत दोन्ही जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. चंद्रपूर व गडचिरोली या दोन्हीकडची दारूबंदी उठवण्यात यावी, यासाठी राज्य सरकारकडे दोन लाख ४० हजार निवेदन प्राप्त झाली आहेत तर दारूबंदी उठवू नये यासाठी २५ हजार निवेदने प्राप्त झाली आहेत. तेव्हापासून वडेट्टीवार यांनी दारूबंदी मागे घेण्यात यावी यासाठी प्रयत्न चालवले आहेत.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त यांच्या स्तरावर एक समिती राहील. ही समिती चंद्रपूर आणि गडचिरोली येथील दारूबंदी, अवैध दारू विक्री, महसुलात झालेली घट, दारू बंदी झाल्यावर जिल्ह्यातील गुन्हे यावर सर्व बाबीवर अहवाल देणार आहेत. ही समिती एक महिन्यात त्यांचा अहवाल देणार आहे. शासकीय आणि अशासकीय लोक या समितीत असणार आहेत.

या समितीचा अहवाल आल्यानंतर त्यावर शासनाकडून एक समिती याचा अभ्यास करणार आहे. शासनाच्या समितीत आमदार, मंत्री, सचिव यांचा समावेश असणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात डॉ अभय बंग यांनी 1988 ते 1993 पाच वर्षे दारू मुक्ती आंदोलन केले. त्यानंतर 1993 मध्ये शासनाने दारूबंदी लागू केली होती.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*