मुख्यमंत्र्यांना ‘सामना’तून समजली पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीची बातमी


विशेष प्रतिनिधी

मुंबई : पोलीस आयुक्तांनी बदल्या केल्यावर गृहमंत्र्यांना माहिती द्यायची आणि त्यानंतर गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत कळवायचे, हा झाला नेहमीचा राजशिष्टाचार. परंतु, मुंबईतील पोलीसांच्या बदल्यांची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सामना दैनिकातील बातमी वाचून समजल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या लेखी या प्रकरणातील आरोपी असलेल्या गृहमंत्री अनिल देशमुख यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्र्यांकडे घेऊन गेल्याचे बोलले जात आहे.

महाविकास आघाडीत शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन पक्षात पोलिस अधिकाऱ्यांच्या मुद्द्यांवरून तणाव निर्माण झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाराजी दूर करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात संध्याकाळी बैठका झाल्या. यामध्ये अनिल देशमुख यांच्या झालेल्या चुकीवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न पवार काका-पुतण्यांनी केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शिवसेना फोडण्याचे पातक केल्याने मुख्यमंत्री प्रचंड नाराज होते. शरद पवार यांनी अजित पवार यांनाही मुख्यमंत्र्यांची समजूत घालण्याची सूचना केली. मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. याची पूर्वकल्पना गृहमंत्र्यांना देण्यात आली होती असे पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना भेटून सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणातील खरे ‘कलप्रिट’ गृहमंत्री अनिल देशमुख असल्याचा समज ठाकरे यांचा झाला.

धक्कादायक म्हणजे त्यांना या बदल्यांची माहिती शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून समजली. त्यामुळे त्यांच्या रागाचा पारा वाढला होता. यातूनच त्यांनी बदल्या रद्द केल्या, असेही सांगितले जात आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था