मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती, अधिकाऱ्यांत पॅचअप नंतर गुन्हा मागे?

विशेष प्रतिनिधी

नाशिक : माझे कुटुंब-माझी जबाबदारी या कोरोना नियंत्रणाच्या मोहिमेच्या प्रतिसादावरून ग्रामविकास अन् महसुलमध्ये जुंपली होती. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता दोन्ही विभागामध्ये पॅचअप झाले.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या आदेशावरून गुन्हयाची फिर्याद रद्द करण्याचे पत्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत अधिकारी यांनी आज सरकार पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना दिले. आढावा बैठकीमध्ये श्री.शींदे यांनी जिल्ह्यातील कुटुंब सर्वेक्षणाचे काम पन्नास टक्के झाल्याची माहिती दिली.

 

ही माहिती खोटी असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने त्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन चोवीस तासात खुलासा सादर करण्यास सांगितले होते,पण त्यावेळेच्या जिल्हा परिषदेच्या ऑनलाइन बैठकी नंतर कार्यालयीन सुट्टीमध्ये श्री.शिंदे मुदतीत खुलासा सादर केला नाही. परिणामी श्री.वाघमारे यांनी केंद्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत श्री.शिंदे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला, मग हे प्रकरण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार लीना बनसोड यांनी गांभीर्याने घेत श्री.मांढरे यांची भेट घेतली.

 

मोहिमेच्या अनुषंगाने सद्यस्थितीचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला तसेच श्री.शिंदे यांनी मोहिम यशस्वी करण्याची ग्वाही दिली.कारणे दाखवा नोटीसचा खुलासा सोमवारी करण्यात आला. शिवाय नोटीसमध्ये उल्लेख केलेली कारवाई प्रस्ताविक करण्यात येऊ नये, अशी विनंती श्री.शिंदे यांनी खुलाश्यात केली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गुन्हयाची फिर्याद रद्द करण्याचे पत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*