चीनी टिकटॉकची जागा घेणार एमएक्स टकाटक


कुरापतखोर चीनला धडा शिकविण्यासाठी आर्थिक कोंडी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिकटॉकसह चीनच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. या टिकटॉकची जागा आता एमएक्स टकाटक घेणार आहे. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : कुरापतखोर चीनला धडा शिकविण्यासाठी आर्थिक कोंडी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टिकटॉकसह चीनच्या ५९ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. या टिकटॉकची जागा आता एमएक्स टकाटक घेणार आहे. हे अ‍ॅप गूगल प्ले स्टोअरवर डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

टिकटॉकप्रमाणे यामध्येही १५ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी कालावधीचे मनोरंजन करणारे व्हिडीओ तयार करुन ते अपलोड करता येणार आहे. त्यामुळे टिकटॉकच्या प्रेमात पडलेल्या तरुणाईला नवा पर्याय मिळाला आहे. एम एक्स प्लेअर एक ओटीटी प्लॅटफॉर्म म्हणून प्रसिध्द आहे. त्यावर अनेक अनेक लोकप्रिय सिनेमा, टीव्ही मालिका, वेब सिरिज फुकटात दाखविल्या जातात. याच एमएक्स प्लेअरने हे टकाटक बनविले आहे.

एम एक्स टकाटकवर डायलॉग डबिंग, कॉमेडी, गेमिंग, रेसिपी, खेळ, मिम्स यासारखे अनेक प्रकार उपलब्ध आहेत. पंतप्रधान मोदी यांनी देशातील तरुणाईला अ‍ॅप चॅलेंज दिले आहे. आत्मनिर्भर भारत अंतर्गत स्वदेशी व्यावसायिक अ‍ॅप तयार करण्याचे आव्हान पंतप्रधानांनी दिले आहे.

तरुणाई आपल्या कौशल्याचे प्रदर्शन आता एम एक्स टकाटकच्या माध्यमातून व्हिडीओ स्वरुपातही सादर करू शकेल. एम एक्स टकाटकवर तयार केलेले व्हिडीओ फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपसह अनेक प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर थेट शेअर करणे शक्य आहे. त्यामुळे एम एक्स टकाटक लवकर लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.

टिकटॉक प्रमाणेच एम एक्स टकाटक या अ‍ॅपवर अनेक इफेक्ट आणि व्हिडीओ एडिटिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. या पर्यायांच्या मदतीने स्वत:चा कमीत कमी कालावधीचा आकर्षक व्हिडीओ तयार करुन अपलोड करणे शक्य आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती