चिनी व्हायरसचा जोर कमी, अर्थव्यवस्था सुधारण्याचा वेग जास्त, निर्मला सितारामन यांचा विश्वास

भारताने कदाचीत चीनी व्हायरस आजारासंबंधी सर्वोच्च शिखर अवस्था गाठली असेल. त्यामुळे आता रुग्णवाढीचा वेग कमी होत आहे. शासनाचे आर्थिक पॅकेज आणि अर्थव्यवस्थेमध्ये सुरू असलेले अनलॉक यांमुळे सप्टेंबर महिन्यात जवळपास सर्वच क्षेत्रातील अर्थव्यवस्था सुधारत आहे, असा विश्वास केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केला.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :  भारताने कदाचित चीनी व्हायरस आजारासंबंधी सर्वोच्च शिखर अवस्था गाठली असेल. त्यामुळे आता रुग्णवाढीचा वेग कमी होत आहे. शासनाचे आर्थिक पॅकेज आणि अर्थव्यवस्थेमध्ये सुरू असलेले अनलॉक यांमुळे सप्टेंबर महिन्यात जवळपास सर्वच क्षेत्रातील अर्थव्यवस्था सुधारत आहे, असा विश्वास केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सितारामन यांनी व्यक्त केला.

सप्टेंबर महिन्याच्या आर्थिक आढावा अहवाल नुकताच जाहीर झाला. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले आहे की, 14 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दरम्यानच्या माहितीवरून सात दिवसांच्या काळात रुग्णसंख्या प्रती दिन 93 हजारांवरून कमी होऊन तो 83 हजारांपर्यंत खाली आली आहे.
सरासरी चाचण्यांची संख्या ही 1 लाख 15 हजारांवरून 1 लाख 24 हजारांपर्यंत वाढली आहे. हा अहवाल चीनी व्हायरसचा धोका कमी होत असल्याचे स्पष्ट करताना असेही सांगतो की देशपाळीवर कोरोनाच्या संख्येत होत असलेली घट ही स्थिती भारतीय अर्थव्यवस्थेला पुर्वपदावर आणण्यासाठी महत्वाची ठरते. ‘सोशल डिस्टंन्सिंग’पेक्षा सावधगिरी बाळगून स्वत:चे संरक्षण करणे ही ‘जान भी और जहां भी’ संकल्पनेत चांगली उचित बसते.
आर्थिक निदेर्शांक जवळपास सर्वच क्षेत्रात सुधारत असताना काही क्षेत्रांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत अधिक वाढ दर्शवली आहे. ही स्थिती लहान शहरात आणि ग्रामीण भागात चीनी व्हायरसचा प्रसार वाढत असतानादेखील आहे. लॉकडाऊन लागू केल्याने जूनच्या तिमाहीत अर्थव्यवस्था उणे 24 इतकी घसरली होता. ‘आत्मनिर्भर भारत  पॅकेज’ आणि सातत्याने होणाऱ्या अनलॉक प्रक्रियेमुळे ही अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे, असेही या अहवालात म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*