चीनच्या सीमेवर ब्रम्होस, आकाश आणि निर्भयही

भारतीय सैन्याने लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैनिकांची मोठ्या संख्येने तैनाती केली आहे. त्याचबरोबर ५०० किमीपर्यंतची माऱ्याची क्षमता असणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र, जमिनीवरून हवेत मारा करू शकणारे आकाश क्षेपणास्त्र आणि ८०० किमी माऱ्याची क्षमता असणारे निर्भय क्षेपणास्त्रही सज्ज ठेवले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारतीय सैन्याने लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सैनिकांची मोठ्या संख्येने तैनाती केली आहे. त्याचबरोबर ५०० किमीपर्यंतची माऱ्याची क्षमता असणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र, जमिनीवरून हवेत मारा करू शकणारे आकाश क्षेपणास्त्र आणि ८०० किमी माऱ्याची क्षमता असणारे निर्भय क्षेपणास्त्रही सज्ज ठेवले आहे.

भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादामुळे संभाव्य धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी भारतीय सैन्याने पूर्ण तयारी केली आहे. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारताने ही तयारी केली आहे. ब्रह्मोस हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करू शकते. या माध्यमातून तिबेट आणि शिनजियांगपर्यंत लक्ष ठेवले जाऊ शकते.

निर्भय क्षेपणास्त्राचीही तैनाती करण्यात आलेली आहे. आठशे किमीपर्यंतची क्षमता असणारे हे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करू शकते. आकाश हे भारतीय सैन्याने तैनात केलेले तिसरे क्षेपणास्त्र आहे. सीमेवरील कोणत्याही विमानाची घुसखोरी रोखण्याची यात क्षमता आहे.

भारताने सीमेवर निर्भय क्रुझ क्षेपणास्त्रही तैनात केले आहे. हे क्षेपणास्त्र हजार किमीपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. निर्भय क्षेपणास्त्र तिबेटमधील चिनी ठिकाणांवर हल्ले करण्यास सक्षम आहे. त्याची मारक क्षमता हजार किमी इतकी आहे. हे क्षेपणास्त्र न भटकता आपलं लक्ष्य टिपण्यास सक्षम आहे. निर्भय क्रुझ क्षेपणास्त्र भारतात तयार केलं गेलं आहे. या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी १२ मार्च २०१३ ला झाली होती. निर्भय हे दोन-टप्प्यातील क्षेपणास्त्र आहे. हे पारंपारिक रॉकेटप्रमाणे सरळ आकाशात जातं आणि नंतर दुसऱ्या टप्प्यात उड्डाण करण्यासाठी ९० अंशात वळण घेतं.

त्याचबरोबर जगात सर्वात अचूक समजल्या जाणाऱ्या टी -९० भीष्म रणगाडे या आधीच तैनात केले आहेत. टी -९० ही भीष्म रणगाड्यांमध्ये क्षेपणास्त्र हल्ला रोखण्याची क्षमता आहे. यात शक्तिशाली एक हजार अश्वशक्ती इंजिन आहे. हे एका वेळी ५५० किमी अंतर कापण्यास सक्षम आहे. त्याचे वजन ४८ टन आहे. हे जगातील सर्वात हलक्या रणगाड्यांपैकी एक आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*