मुख्यमंत्री ठाकरेंची अवस्था गजनीतील अमिर खानसारखी, स्मरणशक्ती वाढविण्यासाठी औेषधे पाठवा, अनिल बोंडे यांची टीका

गजनी सिनेमात विस्मरण होणाऱ्या आमिर खानसारखी अवस्था मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची झाली आहे. मुख्यमंत्र्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने त्यांना च्यवनप्राश व आयुर्वेदिक औषध पाठवावे, अशी टीका माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

उस्मानाबाद : गजनी सिनेमातल्या विस्मरण होणाऱ्या आमिर खानसारखी अवस्था मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची झाली आहे. मुख्यमंत्र्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासठी आयुष मंत्रालयाने त्यांना च्यवनप्राश व आयुर्वेदिक औषध पाठवावे, अशी टीका माजी कृषि मंत्री अनिल बोंडे यांनी केली आहे.

उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना बोंडे बोलत होते. ते म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामध्ये काही तांत्रिक चुका झाल्या आहेत, मात्र आर्थिक घोटाळा झाला नाही.

सरकारने सूडबुद्धीने एसआयटीची नेमणूक केली मात्र एसआयटीच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत. या समितीसोबत मी स्वत: महाराष्ट्रभर फिरेन व त्यांना जलयुक्त शिवारची कामे दाखवीन. जलयुक्त शिवारची कामे करताना काही ठिकाणी ३ मीटर खोदकाम ऐवजी २ मीटर खोदकाम झाले असेल मात्र कामच न करता पैसे लाटले असे प्रकार घडले नाहीत, जलयुक्त शिवारमुळे पाणी पातळी वाढल्याचा दावाही त्यांनी केला.

बोंडे पुढे म्हणाले, पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. मुख्यमंत्री नसताना उद्धव ठाकरे यांनी कोराडवाहूला २५ हजार आणि बागायतीला हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई देऊ अशी मागणी केली होती, याचा त्यांना विसर पडला. सरकारने पंचनामे करण्यापेक्षा सरसकट शेतकऱ्यांना मदत करावी. सरकार मुर्दाड झालं आहे. सरकारने कर्ज काढावे, स्वत: गहाण राहावं, पण शेतकऱ्यांना मदत करावी.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*