कार्यकर्त्यांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी धावले अवघे भाजप


विशेष प्रतिनिधी

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे माजी बागलाण तालुका अध्यक्ष,नामपूरचे माजी सरपंच(कै.) अण्णा सावंत यांचे आकस्मित निधन झाले.त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या कुटुंबियांना अडीच लाख रूपयांच्या मदतीच्या धनादेश देण्यात आला.bjp karyakarta

खासदार डॉ.सुभाष भामरे यांच्याहस्ते नामपूर येथे शनिवारी(कै.)सावंत यांच्या पत्नी कल्पना सावंत यांनी तो स्वीकारला. भाजपकडून एखाद्या कार्यकर्त्यांच्या निधनानंतर कुटुंबियांना धनादेश मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे.

जनसंघापासून भारतीय जनता पक्षाची प्रामामिक सेवा करीत घरादारावर तुळशीपत्र वाहिलेले कै.अण्णा सावंत यांचे नुकतेच अल्प आजाराने निधन झाले. त्यामुळे खासदार डॉ.भामरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून पक्षाच्या या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी पक्षीय पातळीवरून विशेष बाब म्हणून आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा केला.

bjp karyakarta

डॉ.भामरे यांच्या विशेष प्रयत्नामुळे पक्षाने तात्काळ मंजुरी दिल्याने कै.सावंत यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळाली. यावेळी आमदार दिलीप बोरसे,प्रदेश उपाधयक्ष डॉ.शशीकांत वाणी, प्रदेश सदस्य लक्ष्मण सावजी, जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, डॉ.शेषराव पाटील,लकी गिल,तालुकाध्यक्ष संजय देवरे,सटाणा शहराध्यक्ष राहुल सोनवणे,बाजार समितीचे संचालक दिपक पगार आदी उपस्थित होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था