बिहार विथ एनडीए ट्रेंडची ट्विटरवर मोठी आघाडी, वोट फॉर तेजस्वी ट्रेंडची पिछाडी भरून काढताना दमछाक


  • एनडीए – महागठबंधनमधील चुरस वाढतीय, मतदानही मोठ्या टक्केवारीच्या दिशेने

विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारमध्ये मतदानाच्या पहिल्या टप्प्याच्या दिवशी ट्विटर ट्रेंडिंगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एनडीएने घेतलेली आघाडी वाढताना दिसत आहे. बिहार विथ एनडीए हा हँशटँग 44 हजार जणांनी ट्रेंड केला आहे. तर वोट फॉर तेजस्वी हा हँशटँग 33 हजार जणांनी ट्रेंड केला आहे. मात्र पिछाडी भरून काढताना तेजस्वी यादव समर्थकांची दमछाक होताना दिसत आहे. (bihar election voting)

सकाळी 11.15 वाजेपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार 9.7 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क लावून मतदार रांगेत उभे असल्याचे चित्र सर्वत्र दिसते आहे.

आज बदलेगा बिहार हा हँशटँग १३ हजार जणांनी ट्रेंड केला आहे. हा अकडा फारसा बदलेला नाही. बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरवात झाली आहे. या सुरवातीच्या ट्विटर ट्रेंडवरून राज्यात भाजप – जनता दल युनायटेड विरूद्ध लालू प्रसादांचा राष्ट्रीय जनता दल – काँग्रेस आघाडीमधील चुरस दिसून येते आहे. राम विलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान स्वतंत्रपणे नशीब अजमावत आहेत. त्यांचा ट्विटर टॉपमध्ये मागमूसही सध्या दिसत नाही.

bihar election voting

मात्र, ट्विटर ट्रेंडच्या चुरशीत भाजप – जदयू राष्ट्रीय लोकशाही आघाडी टॉपवर आहे. मतदानाचा वेग जसजसा पुढे सरकेल तसे हे ट्विटर ट्रेंडिंग ट्विटर वॉर मध्ये रूपांतरीत होताना दिसेल. त्यात कोण बाजी मारेल किंवा कशा पद्धतीने निवडणुकीतील चुरस दिसेल याची झलक पाहायला मिळेल. राज्यातील निवडणूक प्रचारात सर्वच बाजूंनी एनडीएने आघाडी घेतली होती. त्याचे प्रत्यंतरच आजच्या सुरवातीच्या ट्विटर ट्रेंडवरून दिसते आहे.

राज्यात अँटी इन्कबन्सी किंवा कोरोनाच्या पार्शंवभूमीवर बिहारमधील मजूरांची घरवापसी या महत्त्वाच्या मुद्यांचा फारसा प्रभाव प्रचाराच्या वेळी पडला नसल्याचे स्पष्ट झाले होते. ट्विटरवरच्या आजच्या ट्रेंडमध्ये त्याचेच प्रतिबिंब पडल्याचेही दिसत आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था