अर्णब गोस्वामी प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करावी, देवेंद्र फडणवीस यांची मागणी


रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत. या सगळ्याची न्यायालयाने दखल घ्यावी. या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक करण्यापासून ते न्यायालयीन कोठडीत त्यांना ज्याप्रकारे वागणूक दिली जात आहे, याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत. या सगळ्याची न्यायालयाने दखल घ्यावी. या प्रकरणात उच्च न्यायालयाने स्यूमोटो याचिका दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

याबाबत फडणवीस यांनी ट्विट केले आहे. अर्णब गोस्वामींकडून सातत्याने पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला जात आहेत. अलिबागवरून तळोजा तुरुंगात नेत असताना अर्णब गोस्वामींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. माझा जीव धोक्यात आहे. मला माझ्या वकिलांशी बोलून दिले जात नाही. पोलिसांनी मला धक्काबुक्की केली. त्यामुळे माझ्या जीवाला धोका असल्याचे गोस्वामी यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते.

दरम्यान, अर्णब गोस्वामींच्या अटक प्रकरणात महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उडी घेतली आहे. याबाबत राज्यपालांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन करुन गोस्वामी यांच्या सुरक्षा आणि आरोग्यबाबत चिंता व्यक्त केली आहे. गोस्वामी यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू देण्याची तसेच त्यांच्याशी बोलण्याची परवानगी द्यावी, अशी सूचनाही राज्यपालांनी गृहमंत्र्यांना केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती