अर्णब गोस्वामी अटकेत मानवाधिकारांचे उल्लंघन, भाजप नेते गौरव भाटिया यांचे सरन्यायाधीशांना पत्र

अर्णब गोस्वामी यांच्या अटक प्रकरणात मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे अशी तक्रार भारतीय जनता पक्षाचे नेते गौरव भाटिया यांनी केली आहे. भाटीया यांनी याबाबत थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहिले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अर्णब गोस्वामी यांच्या अटक प्रकरणात मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे अशी तक्रार भारतीय जनता पक्षाचे नेते गौरव भाटिया यांनी केली आहे. भाटीया यांनी याबाबत थेट सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांना पत्र लिहिले आहे.

भाटिया यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकार आणि पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना केलेली अटक ही पूर्णपणे असंवैधानिक आहे. ही अटक अवैध तर आहेच; पण त्याच बरोबर यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचेही दिसत आहे.

रिपब्लिक मीडिया आणि त्याचे संपादक गोस्वामी यांना लक्ष्य केले जातेय. तसेच त्यांनी अपमानीतही करण्यात येतंय. अर्णव यांनी पालघर साधू हत्या, सुशांतसिंह राजपूत आतम्हत्या प्रकरण तसेच अन्य प्रकरणात महाराष्ट्र सरकारला प्रश्न विचारल्यामुळे त्यांना ही शिक्षा दिली जात आहे.

गोस्वामी यांना अटक म्हणजे भारतीय लोकशाहीच्या चौथ्या खांबावर थेट प्रहार आहे, असंही भाटीया यांनी सरन्याधीशांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद बोलवून रिपब्लिक टीव्हीवर टीआरपी घोटाळा केल्याचा खोटा आरोप केला. बंद करण्यात आलेल्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी पुन्हा सुरु करुन गोस्वामी यांना 4 नोव्हेंबर 2020 च्या सकाळी अटक केली. ही सर्व उदाहरणं सत्तेच्या दुरुपयोगाची आहे, असं भाटिया म्हणाले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*