अर्णब गोस्वामींचा न्याय लावून अनिल परब यांना अटक का नाही, अतुल भातखळकर यांचा सवाल


जर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीची अटक होऊ शकते. तर एसटीचे वाहक मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणी बेशरम ठाकरे सरकार परिवहनमंत्री अनिल परब यांना का अटक करत नाही? मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाही जबाबदार धरावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : जर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीची अटक होऊ शकते. तर एसटी चे वाहक मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणी बेशरम ठाकरे सरकार परिवहनमंत्री अनिल परब यांना का अटक करत नाही? मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाही जबाबदार धरावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दिवाळीचा सण तोंडावर असताना पगार थकल्यानं एका एस.टी कर्मचाऱ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची ह्रदयद्रावक घटना जळगाव जिल्ह्यात नुकतीच घडली. माझ्या आत्महत्येला एसटी महामंडळातील कार्यपद्धती व ठाकरे सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत या कंडक्टरनं टोकाचं पाऊलं टाकल्याचं समोर आलं आहे. यावरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे ऑगस्ट, सप्टेंबरपाठोपाठ ऑक्टोबर महिन्याचे एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडलं आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्व एसटी कर्मचारी चिंतेत आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. जळगाव जिल्ह्यातील रायपूर कुसुम्बा गावातील रहिवासी असलेले मनोज चौधरी यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

दिवाळी उत्सवात महापालिका आणि पोलिसांनी लादलेल्या जाचक अटी पाहता हिंदूना कायदे आणि अन्य धर्मियांना फायदे असे सेक्युलर धोरण ठाकरे सरकारने अंगिकारलेले दिसत आहे. अशी देखील टीका भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती