आदित्य ठाकरेंना लक्ष्य करणारी पार्थ पवारांची विनंती गृहमंत्र्यांनी फेटाळली


उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी केली होती. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास करण्यासाठी मुंबई पोलिस सक्षम आहेत, असे सांगून पार्थ यांचे म्हणणे फेटाळून लावले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यात यावा, अशी मागणी केली होती. मात्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास करण्यासाठी मुंबई पोलिस सक्षम आहेत, असे सांगून पार्थ यांचे म्हणणे फेटाळून लावले आहे.

२७ जुलै रोजी पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी पत्र दिले होते. ते पत्र माध्यमांकडे कसे आले याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. यामागे राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची किनार असल्याचे बोलले जात आहे. एकीकडे मुंबई पोलीस याप्रकरणाचा तपास करत असताना, पार्थ पवार यांनी अशा पद्धतीचे पत्र देणे, यामुळे शिवसेनेत तीव्र नाराजी आहे.

अजित पवार यांना सांगून पार्थ यांनी पत्र दिले होते का? की त्यांनी परस्परच हे पत्र दिले, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाविषयी आपली नाराजी शरद पवार यांच्याकडे व्यक्त केल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे यांनी पार्थ पवार यांचे काही व्हिडीओ ट्विट केले होते. त्यामध्ये पार्थ पवार हे आक्षेपार्ह स्थितीत होते.

यावरून पार्थ पवार यांच्यावर चांगलीच टीका झाली होती. याचाच वचपा काढण्यासाठी पार्थ यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली. याचे कारण म्हणजे आदित्य ठाकरे हे या प्रकरणात चौकशी होत असलेले करण जोहर यांचे जवळचे मित्र आहेत. आदित्य-करण यांच्यात असणाऱ्या मैत्रीमुळेच मुंबई पोलीसांनी करण जोहर यांना चौकशीसाठी बोलावले नव्हते, अशी चर्चा आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था