ही पाहा काँग्रेसच्या माजी शिक्षणमंत्र्याची महिलांविषयी भेदभावी मानसिकता


  • म्हणे, पाच मुली झाल्या, पण ‘विकास’ अजून जन्मलाच नाही; मोदींनी “विकासा”साठी सर्व योजना देशावर लादल्या
  •  मध्य प्रदेश काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचे ट्विट

विशेष प्रतिनिधी

भोपाळ : मध्य प्रदेशातील एका काँग्रेस नेत्याची महिलांविषयी भेदभावाची सडकी मानसिकता समोर आली आहे. जितू पटवारी असे त्याचे नाव आहे. ते मध्य प्रदेशचे माजी शिक्षणमंत्री आहेत. त्यांनी केलेल्या एका टि्वटमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या नेत्याने नोटबंदी, जीएसटीसह केंद्र सरकारच्या योजनांची थेट मुलींबरोबर तुलना केली. मुलासाठी म्हणजे ‘विकास’साठी या सर्व योजना देशावर लादण्यात आल्या, असे नादान टि्वट जीतू पटवारी यांनी केले.

“लोकांना मुलाची अपेक्षा होती. पण पाच मुलींचा जन्म झाला. विकास अजूनही जन्मलेला नाही” असे वादग्रस्त टि्वट जीतू पटवारी यांनी केले. जीतू पटवारी हे माजी शिक्षण मंत्री असून पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आहेत.

‘सबक साथ, सबका विकास’ या केंद्राच्या घोषवाक्यावर टीका करण्यासाठी म्हणून जीतू पटवारी यांनी हे टि्वट केले होते. २०१४ आणि २०१९ लोकसभा निवडणुकीच्यावेळी पंतप्रधान मोदींनी ‘सबक साथ, सबका विकास’ ही घोषणा दिली होती.

सगळीकडून भडीमार झाल्यानंतर जीतू पटवारी यांनी ट्विटबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पण त्यातून त्यांची महिलांविषयी भेदभावाची सडकी मानसिकता दिसल्याशिवाय राहिली नाही. “कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो. मुली या देवीतुल्य आहेत” अशी मखलाशी पटवारी यांनी दुसऱ्या टि्वटमध्ये केली.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती