स्वातंत्र्यदिनाचे खवचट ट्विट करणारे जावेद अख्तर नेटिझन्सकडून ट्रोल

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ७४ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात संपूर्ण देशभरात साजरा होत असताना खवचट ट्विट करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या जावेद अख्तर यांना नेटिझन्सनी ट्रोल केले आहे.

देशावर कोरोनाचेे सावट आहे, त्यामुळे अत्यंत साध्या पद्धतीने हा दिवस साजरा करण्यावर देशातील नागरिकांचा भर होता. परंतु, या काळातही नागरिकांमध्ये दरवर्षीप्रमाणेच तितक्याचे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण होते. यात अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यात जावेद अख्तर यांनी १५ ऑगस्टच्या रात्री ट्विट करत शुभेच्छा दिल्या. मात्र, नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल केले आहे.

“माझ्या समस्त भारतीय बंधू-भगिनींनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपले स्वातंत्र्य “असेच अबाधित” राहू दे”, असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले. मात्र रात्री उशीराचे त्यांचे हे खवचट ट्विट पाहून नेटकऱ्यांनी त्यांनी ट्रोल केले. विशेष म्हणजे त्यांनी रात्री उशीरा ट्विट केल्यामुळे त्यांच्यावर ट्रोल होण्याची वेळ आली आहे.

ट्रोलकऱ्यांचे बोल :

“चला, निदान रात्री ११ वाजता का होईना पण तुम्हाला ही पोस्ट लिहावीशी वाटली.”

“यांचा स्वातंत्र्य दिवस काल होता त्यामुळे कदाचित ते त्याच विचारांमध्ये होते आणि आता जागे झाले आहेत.”

“तुम्ही आणि फरहान प्रत्येक गोष्टीविषयी इतक्या उशीरा का भाष्य करता? नशीब २-४ दिवसांनी नाही शुभेच्छा दिल्या…!!”

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*