सोनिया सेना’ बाबराच्या सेनेपेक्षा वाईट, कंगना रनौटची टीका

‘सोनिया सेना’ बाबराच्या सेनेपेक्षा वाईट असल्याचे म्हणत कंगना रनोटने उद्धव ठाकरे आणि सरकारवर टीका केली आहे. कंगनाने ट्विट केले की, या गुंडा सरकारने बार आणि रेस्टॉरंट्स उघडले पण मुद्दामहुन मंदिरे बंद ठेवली. ‘सोनिया सेना’ ही बाबराच्या सेनेपेक्षा वाईट आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : ‘सोनिया सेना’ बाबराच्या सेनेपेक्षा वाईट असल्याचे म्हणत कंगना रनोटने उद्धव ठाकरे आणि सरकारवर टीका केली आहे. कंगनाने ट्विट केले की, माननीय राज्यपालांनी गुंडा सरकारला प्रश्न विचारला, हे ऐकून छान वाटले. या गुंडा सरकारने बार आणि रेस्टॉरंट्स उघडले पण मुद्दामहून मंदिरे बंद ठेवली. ‘सोनिया सेना’ ही बाबराच्या सेनेपेक्षा वाईट आहे.

राज्यातील मंदिरे सुरू करण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून हिंदुत्वाची आठवण करुन दिली. राज्यपालांच्या पत्राला मुख्यमंत्र्यांनीही चांगलेच प्रत्युत्तर दिले. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण आता तापले आहे. यात आता बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटने उडी घेतली आहे.

भगत सिंह कोश्यारी यांच्या पत्राला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. याबाबत बोलताना राऊत म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे हे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांचा आत्मा आणि मन हिंदुत्वाने ओतप्रोत भरलेले आहे. त्यांना हिंदुत्त्वाचे धडे देण्याची गरज नाही. ठाकरे सरकार लोकनियुक्त आहे आणि राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यामुळे सरकार घटनेनुसार चालत आहे की नाही तेवढेच पाहा.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*