सुशांत सिंह आत्महत्या तपासात महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांची लुडबुड

सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बॉलिवूड, ड्रग्ज आणि राजकीय नेत्यांच्या विषारी युतीचा संबंध आहे. ही युती चव्हाट्यावर येऊ नये म्हणून राज्य सरकारमधील काही मंत्री निकराचे प्रयत्न करत होते, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांंनी केला आहे. याबाबतची माहिती सीबीआयला देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बॉलिवूड, ड्रग्ज आणि राजकीय नेत्यांच्या विषारी युतीचा संबंध आहे. ही युती चव्हाट्यावर येऊ नये म्हणून राज्य सरकारमधील काही मंत्री निकराचे प्रयत्न करत होते, असा आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार अतुल भातखळकर यांंनी केला आहे. याबाबतची माहिती सीबीआयला देण्याची तयारी असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीसांनी बॉलीवुडमधील अनेकांची चौकशी सुरू केली होती. मात्र, काही जणांची चौकशी करण्यात आली नव्हती. प्रसिध्द निर्माते करण जोहर यांची चौकशी न करता त्यांच्या मॅनेजरची चौकशी करण्यात आली होती. प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटने आरोप केला होता की जोहर हे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचे मित्र आहेत. त्यामुळेच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले नाही.

याच पार्श्वभूमीवर भातखळकर म्हणाले आहेत की, सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलिसांवर कशा प्रकारे दबाव टाकला जात होता आणि कोणाकडून टाकला जात होता, याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. सीबीआयला ही माहिती देण्याची तयारी आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भातखळकर यांनी या संदर्भात पत्र लिहिलं आहे. सुशांत प्रकरणात मुंबई पोलिसांनी बॉलिवूडमधील अनेक निमार्ते, दिग्दर्शकांची चौकशी केली होती. मात्र, काही लोकांना बोलावण्यात आले नव्हते. त्यावरून राज्य सरकारवर आरोप होत होते.

मुंबई पोलिसांवर दबाव येत असल्याचा आरोप भाजपनं केला होता. आता भातखळकर यांनी अमित शहा यांना पत्र लिहून याबाबत माहिती देण्याची तयारी दर्शवली आहे. मुंबई पोलिसांनी सुशांत प्रकरणात बॉलिवूडमधील मंडळीची चौकशी सुरू केल्यानंतर विशिष्ट लोकांना चौकशीला बोलवू नये. बोलवायचेच असेल तर अमूक अमूकच स्टेंटमेंट घ्या, असा दवाब पोलिसांवर टाकला गेला होता. सीबीआयने या साऱ्यांचा पदार्फाश करावा, अशी मागणी भातखळकर यांनी पत्राद्वारे केली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*