सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण हे भाजपचा बनाव,अपयशी पाटील बडबडले

विशेष प्रतिनिधी

नाशिक : बॉलिवुड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून भाजप ठाकरे सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. या आत्महत्या प्रकरणातून ठाकरे सरकार पडणार असे भाजपचा दावा असला तरी त्यांचे आमदार वाचवण्याची ही बनाव असल्याचे शिवसेनेचे स्वच्छता मंत्री तथा जळगावाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

त्यांचे हे स्पष्टीकरण म्हणजे भाजपवर प्रतिहल्ला केला असल्याचे मानले जात असलेतरी प्रत्यक्षात स्वच्छता मंत्री असलेल्या पाटील यांनी आपल्या शिवसेनेतील कुरबुऱ्या करणाऱ्यांची स्वच्छता करावी,अशी टिका होऊ लागली आहे.

सुशांत प्रकरणात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सीबीआय चौकशीची मागणी आणि त्यानंतर त्यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रभारीपदी झालेली निवड, हा योगायोग आहे, अशी टिका धनंजय मुंडे यांनी केली होती.

यावर देवेंद्र फडणवीस हे पुण्यात मराठी पत्रकार संघ कोविड सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासावर बोलतांना म्हणाले, की सुशांत केस आणि माझ्या बिहार नियुक्तीचा कवडीचा संबंध नाही. महाराष्ट्र पोलिसाचं काम चांगले आहे,पण सुशांत केसमध्ये त्यांच्यावर राजकीय दबाव आहे,असे आरोप केले.

राष्ट्रवादी-शिवसेनेत कुठलेच मतभेद नाही

राष्ट्रवादी व शिवसेनेतील मतभेदाविषयी मंत्री पाटील म्हणाले, सुशांत आत्महत्या प्रकरणी सरकार पडेल, हा भाजपाचा दावा म्हणजे आमदार वाचवण्यासाठी केलेला बनाव आहे, असे फडणवीसांवर प्रतिहल्ला केला तर या प्रकरणावरून राष्ट्रवादी आणि आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत, असा दावा पाटील यांनी केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*