सुशांतच्या मोबाईलचा महाराष्ट्र पोलीसांना धसका!, इडीच्या विनंतीनंतरही द्यायला तयार होईनात

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मोबाईल फोनमधील माहितीचा महाराष्ट्र पोलीसांनी जणू धसका घेतला आहे. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चार वेळा मागणी करूनही पोलीस मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द करायला तयार नाहीत.


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मोबाईल फोनमधील माहितीचा महाराष्ट्र पोलीसांनी जणू धसका घेतला आहे. त्यामुळे सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चार वेळा मागणी करूनही पोलीस मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द करायला तयार नाहीत.

सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) सुरू असलेल्या चौकशीदरम्यान रिया चक्रवर्तीसह अनेकांचे कॉल डिटेल्स काढण्यात आले. यातूनच हाती लागलेल्या माहितीच्या पडताळणीसाठी ईडीला सुशांतचा मोबाइल हवा आहे. मुंबई पोलिसांकडे त्यांनी चार वेळा पत्राद्वारे मोबाइलची मागणी केली आहे. मात्र, त्यांना मोबाईल देण्यास पोलीस तयार नाहीत.

बिहार पोलिसांनी दाखल कलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा नोंद करून याप्रकरणी तपास सुरू केला आहे. यात ईडीने सुशांतची मैत्रीण रियासह तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीकडे केलेल्या चौकशीदरम्यान त्यांच्याकडील लॅपटॉप, मोबाइल ताब्यात घेतले. त्यानंतर आता सुशांतच्या मोबाइल आणि कॉल सीडीआरमधून त्यांना आर्थिक व्यवहाराची माहिती घ्यायची आहे. कारण, सुशांतच्या मोबाईल मध्ये नेट बँकिंग सुविधा होती.

तपासादरम्यान सुशांतचा मोबाइल मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तो मिळवा यासाठी ईडीने त्यांच्यासेबत चारवेळा पत्रव्यवहार केला आहे. तसेच सुशांत प्रकरणात जप्त केलेले डिजिटल पुरावे देण्याची विनंतीही ईडीने केली आहे. मात्र मुंबई पोलिसांनी अद्याप प्रतिसाद दिला नाही. सुशांतचा मोबाईल हा या प्रकरणातील सर्वात महत्वाचा पुरावा ठरणार आहे.

सुशांतचे कोणाशी संबंध होते, त्याला कोणी धमकाविले होते का? याचा तपास मोबाईलवरील कॉल रेकॉर्डमुळे लागणार आहे.
राज्याचे राजकारणच या प्रकरणामुळे ढवळून गेले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य यांच्या काही मित्रांना पोलीसांनी चौकशीसाठी बोलावले होते. सुशांतची मॅनेजर दिशा सॅलीयनच्या आत्महत्येकडेही संशयाने पाहिले जात आहे. ज्या दिवशी तिने आत्महत्या केली त्या दिवशी झालेल्या पार्टीत एक राजकीय नेता उपस्थित होता, असे म्हटले जात आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*