सीमेवरील जवानांच्या मृत्यूपेक्षा तृणमूल खासदार नुसरत जहाला टिकटॉकची चिंता

टिकटॉक सारख्या चीनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे संपूर्ण देश स्वागत करत आहे. तृणमूल कॉंग्रेसची खासदार आणि बंगालमधील अभिनेत्री नुसरत जहा यांना टिकटॉकची चिंता असून यामुळे काही जण बेरोजगार होतील, असे त्यांनी म्हटले आहे. यामुळे नुसरत जहा यांच्यावर टीकेची झोड उठत आहे.


 विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : टिकटॉकसारख्या चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाचे संपूर्ण देश स्वागत करत आहे. तृणमूल कॉंग्रेसची खासदार आणि बंगालमधील अभिनेत्री नुसरत जहा यांना टिकटॉकची चिंता असून यामुळे काही जण बेरोजगार होतील, असे त्यांनी म्हटले आहे.

यामुळे नुसरत जहा यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. खासदार नुसरत जहा म्हणाल्या, देशाच्या सुरक्षेच्या कारणावरून टिकटॉकवर बंदी घातली. या निर्णयाबाबत मला काही म्हणायचे नाही. परंतु, त्यामुळे अनेक जण बेरोजगार होणार आहेत. सरकारने या मनोरंजन अ‍ॅपवर बंदी घालून काय साधले?

कोलकत्ता येथील इस्कॉन मंदिरातील उल्टा रथ यात्रेत सहभागी होण्यासाठी आलेल्या नुसरत जहा म्हणाल्या, टिकटॉकवर बंदी घालून सरकारने काय साध्य केले? यापेक्षा चीनला रोखण्यासाठी रणनिती आखायला पाहिजे होती.

यावर नागरिकांनी जोरदार टीका केली आहे. नटी म्हणून काम केलेल्यांकडून राजकीय परिपक्तवतेची अपेक्षा करणेच चुकीचे आहे, अशी टीका करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या कोणत्याही निर्णयावर टीका करायची सवय ममता बॅनर्जी यांना आहे. त्यांचेच अनुकरण करताना नुसरत जहा यांनी देशाची चिंता करण्याची गरज वाटत नाही. मात्र, केंद्र सरकारवर टीका करताना त्यांनी भारतीय नागरिक असल्याचा विचार करावा, असे म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*