सीमा भाग होणार कनेक्टेड, गृह मंत्रालयाची युध्दपातळीवर रस्ते बांधणी


चीनची सीमा आणखी सुरक्षित करण्यासाठी या भागात तातडीने सैन्य पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी गृह मंत्रालयाने सीमा भाग कनेक्टेड करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागात आता वेगाने रस्ते बांधणी होणार आहे.विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनची सीमा आणखी सुरक्षित करण्यासाठी या भागात तातडीने सैन्य पोहोचणे आवश्यक आहे. यासाठी गृह मंत्रालयाने सीमा भाग कनेक्टेड करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागात आता वेगाने रस्ते बांधणी होणार आहे.

सीमा भागाचे रक्षण करण्याची जबाबदारी सीमा सुरक्षा दलावर (बीएसएफ) वर असते. हे दल गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी सीमांच्या सुरक्षा सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे.  

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या सीमा व्यवस्थापनचे  सचिव संजीव कुमार यांनी सोमवारी एका आठवड्यात दुसर्यांदा प्रत्यक्ष ताबा रेषेला लागून असलेल्या पायभूत योजनांची पाहणी केली.

भारत-चीन सीमेला लागून असलेल्या भागात पायाभूत सुविधा उभारण्याचे काम वेगाने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये  ३२ योजनांचा समावेश आहे. चीनला लागून असलेल्या ३२ रस्त्यांच्या बांधणीचे काम करण्यात येणार आहे. सर्व संबंधित संस्था आणि यंत्रणांना या पायाभूत योजना जलद गतीने पूर्ण करण्यासाठी समन्वयाने काम करणार आहेत.

भारत-चीन सीमेला लागून एकूण ७३ रस्त्यांची बांधणी केली जात आहे. त्यापैकी सीपीडब्ल्यूडी १२ आणि बीआरओ ६१ रस्त्यांचे बांधकाम केंद्रीय गृहमंत्रालयाच्या देखरेखीखाली सुरू आहे. रस्त्यांशिवाय वीज पुरवठा, आरोग्य सेवा, दूरसंचार आणि शिक्षणाशी संबंधीत योजनाही प्राधान्याने पूर्ण करण्यात येणार आहे. अलिकडच्या काही वर्षात भारत-चीन सीमा भागातील रस्त्यांच्या बांधणीत वाढ झाली आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून चीनच्या सीमारेषेवर आवश्यक पायाभूत सुविधा तयार करण्याचे काम सुरू झाले. २०१७ पासूनच सीमेला लागून असलेल्या भागांमध्ये रस्ते बनवण्यासाठी ४७० किलोमीटर फॉर्मेशन कटिंगचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

धक्कादायक म्हणजे यापूर्वी २००८ ते २०१७  या काळात फक्त २३० किलोमीटरचे काम झाले होते. २०१४ – २० दरम्यान सहा बोगद्यांमधून रस्त्यांची बांधणी केली गेली आहे. तर २००८ ते १४ दरम्यान फक्त बोगदा असलेल्या एकाच रस्त्याचे काम झाले होते. 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था