सर्वांना आरोग्य लाभो, हीच विठ्ठल चरणी प्रार्थना; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीतून दिल्या आषाढीच्या शुभेच्छा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आषाढी एकदशीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकरी परंपरेच्या इतिहासाला उजाळा दिला आहे. विशेष म्हणजे जय जय पांडुरंग हरी म्हणत पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून ट्विट केले आहे. यात त्यांनी प्रार्थना केली आहे, “आषाढी एकादशी म्हणजे वारकरी परंपरेचे स्मरण करण्याचा दिवस. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम आणि इतर अनेक संत ज्यांनी समानता आणि सामाजिक सलोखा यांची शिकवण देत आपल्याला सदैव प्रेरणा दिली, अशा सर्व संतांना नमन.

आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा.विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी रहावे, या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. जय जय पांडुरंग हरी.”

करोनाची नजर लागली

आषाढी एकदशी म्हटलं की, डोळ्यासमोर येतं गजबजलेले पंढरपूर. वारकऱ्यांच्या अलोट गर्दीने भरून गेलेली चंद्रभागा. आसमंतापर्यंत पोहोचणार विठ्ठलाचा गजर… पण यंदा असे काहीच नाही. लेकुरवाळ्या विठू माऊलीची भक्तांसोबतची भेट यंदा चुकली. आषाढ वारीला करोनाची नजर लागली. त्यामुळे विठ्ठलाचा जयघोष करत जाणाऱ्या ज्ञानोबा, तुकाराम महाराजांच्या पालख्याही घाईत एसटीतून विठ्ठलाच्या भेटीला गेल्या. विठ्ठल भेटीच्या ओढीला वारकऱ्यांना यंदा आवर घालावा लागला. भूवैकुंठी होणाऱ्या संत भेटीच्या सोहळ्याला हजारो वारकऱ्यांना यंदा करोनामुळे उपस्थित राहता आलं नाही

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*