संजय राऊत खोटे बोलताहेत; सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केलीच नाहीत


  • वडिलांच्या दोन लग्नांमुळे सुशांत नाराज असल्याचा होता संजय राऊतांचा आरोप

वृत्तसंस्था

पाटणा : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंभोवती संशयाचे ढग गडद होताना संजय राऊतांनी वेगळीच “थिअरी” मांडली. सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केल्यामुळे सुशांत नाराज होता, असा आरोप राऊत यांनी केला होता. त्याला सुशांतच्या कुटुंबियांनी सणसणीत उत्तर देऊन संजय राऊत खोटे बोलत आहेत, असा प्रतिटोला लगावला आहे. संजय राऊतांचे आरोप आरोप सुशांतच्या मामाने फेटाळले आहेत.

सुशांतचे त्याच्या कुटुंबाशी संबंध चांगले नव्हते असा दावा राऊत यांनी सामनामधून केला होता. सुशांतच्या वडिलांनी दुसरे लग्न केले होते. ते सुशांतला आवडले नव्हते, असा आरोप राऊत यांनी केला होता. यावर सुशांतच्या वडिलांनी दोन लग्न केली नाहीत.

संजय राऊत खोटे बोलत आहेत, असे सुशांतचे मामा आर. सी. सिंग यांनी सांगितले. बिहारमध्ये जे राहतात त्या सगळ्यांना माहितीये की सुशांतच्या वडिलांनी एकच लग्न केले आहे, असेही सिंग म्हणाले.

संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या इशाऱ्यावरून चुकीचे वक्तव्य केले आहे. राऊत असे वक्तव्य करून प्रतिमा मलिन करायचा प्रयत्न करत आहेत, असा प्रत्यारोपही सिंग यांनी केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती