संकटकाळातही भ्रष्टाचार असेल तर ईश्वरच मालक, देवेंद्र फडणवीसांचा आरोप

महाराष्ट्रासह मुंबईत चीनी व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. मात्र, या संकटाच्या काळातही भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहेत. खरेदीत भ्रष्टाचार होत असेल तर ईश्वरच मालक आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी 

मुंबई : महाराष्ट्रासह मुंबईत चीनी व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या पाहिजेत. मात्र, या संकटाच्या काळातही भ्रष्टाचाराची प्रकरण बाहेर येत आहेत. खरेदीत भ्रष्टाचार होत असेल तर ईश्वरच मालक आहे, असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र जनसंवाद रॅलीत फडणवीस बोलत होते. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पियुष गोयल, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, विनोद तावडे, नारायण राणे आदी नेते यावेळी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, चीन व्हायरसने बाधितांचा आकडा महाराष्ट्रात वाढत आहे, ही चिंता वाढविणारी बाब आहे. मात्र, ही परिस्थिती हाताळताना आघाडी सरकारकडून प्रचंड चुका होत आहेत. केवळ चाचण्या कमी करून ही लढाई जिंकता येणार नाही. परिस्थिती काळजीची आहे. मी टीका करीत नाही. केवळ सूचना करतो आहे. पण हे सरकार चीनी व्हायरसशी नाही तर आकडेवारीशी लढते आहे. सतत वाढणाऱ्या आकड्यांकडे यावर सरकारने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

मजबूत नेता असल्यास किती वेगाने काम होऊ शकते याचा आदर्श पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घालून दिला असल्याचे सांगून फडणवीस म्हणाले, कोकणात निसर्ग चक्रीवादळ आले, तेव्हा सुद्धा राज्य सरकारची मदत पोहोचण्यापूर्वी भाजपची मदत पोहोचली. प्रत्येक घटकासाठी पंतप्रधानांनी काम केले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*