शेतकऱ्यांना रेल्वेकडून किसान रेलची भेट, नाशिवंत मालाची होणार जलद वाहतूक


चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत देशातील कृषि अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांना किसान रेलची भेट दिली आहे. भाजीपाला, फळे यासारख्या नाशिवंत मालाच्या जलदगतीने वाहतुकीसाठी रेल्वेची ‘किसान रेल’ ही विशेष सेवा शुक्रवारपासून सुरू होत आहे. पहिली किसान रेलची गाडी नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथून बिहारमधील दानापूरकडे रवाना होईल.


विशेष प्रतिनिधी

पुणे : चीनी व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत देशातील कृषि अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी भारतीय रेल्वेने शेतकऱ्यांना किसान रेलची भेट दिली आहे. भाजीपाला, फळे यासारख्या नाशिवंत मालाच्या जलदगतीने वाहतुकीसाठी रेल्वेची ‘किसान रेल’ ही विशेष सेवा शुक्रवारपासून सुरू होत आहे. पहिली किसान रेलची गाडी नाशिक जिल्ह्यातील देवळाली येथून बिहारमधील दानापूरकडे रवाना होईल.

अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी यंदाचा अर्थसंंकल्प मांडताना शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आखल्या होत्या. त्याची पूर्तता आता होणार आहे. नाशिवंत मालाच्या पूर्णपणे वातानुकुलित रेल्वे जाणार आहे. वाहतुकीसाठी खासगी उद्योगांच्या भागिदारीने अशी विशेष रेल्वे सुरु करण्याची घोषणा सितारामन यांनी केली होती. रेल्वेने शेतकऱ्यांना शेतापासून बाजारपेठेपर्यंत विनाखंड वातानुकुलित वातावरणात मालाची वाहतूक करण्याची सोय उपलब्ध होईल.

केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर व रेल्वेमंत्री पियुष गोयल दिल्लीतील ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’ने या गाडीला हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. मध्य रेल्वेचा भुसावळ विभाग हा प्रामुख्याने शेतीप्रधान भाग आहे. त्यामुळे पहिली किसान रेल याच भागातून जाणार आहे. त्यातही नाशिक जिल्हा आणि परिसरात ताज्या भाज्या, फळे, फुले, कांदे व अन्य नाशिवंत मालाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. किंबहुना हा परिसर ‘किचन गार्डन’ म्हणूनच ओळखला जातो. हा माल महाराष्ट्रातील अन्य शहरांखेरीज अन्य राज्यांमध्ये पाटणा, अलाहाबाद, कटनी, सतना इत्यादी ठिकाणी पाठविला जातो.

विविध प्रकारच्या नाशवंत मालांसाठी एकत्रित अशी गाडी प्रथमच चालविण्यात येत आहे. याशिवाय ‘कन्टेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया’च्या (सीसीआय) ‘सीएसआर’ निधीतून रेल्वेने उत्तर प्रदेशात गाझीपूर घाट व राजा का तालाब आणि दिल्लीत न्यू आझादपूर येथे नाशवंत मालासाठी तापमान नियंत्रित केलेली ‘कार्गो सेंटर’ सुरु केली. नशिक जिल्ह्यात लासलगाव येथेही अशीच एक योजना प्रगतिपथावर आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती