शिवसेना फोडण्याचा प्रयत्न चालू असतानाच राष्ट्रवादीचा कॉंग्रेसही फोडण्याचा डाव; वसंतदादा पाटील यांच्या नातसूनेला दिला जाणार राष्ट्रवादीत प्रवेश


नगर जिल्ह्यातील पारनेर प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक फोडल्यावर तोंडावर पडल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसने सत्तेतील दुसरा मित्रपक्ष असलेल्या कॉंग्रेसवर नजर वळवली आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि पश्चिम महाराष्ट्रातील मातब्बर कॉंग्रेस घराणे असलेल्या वसंतदादा पाटील यांचे घर फोडण्याचा डाव आखला गेला आहे. वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांच्या गटातील कॉंग्रेसचे नगरसेवकांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्याची तयारी करण्यात आली आहे.


विशेष प्रतिनिधी

सांगली : नगर जिल्ह्यातील पारनेर प्रकरणात शिवसेनेचे नगरसेवक फोडल्यावर तोंडावर पडल्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कॉंग्रेस फोडण्याचा डाव रचला गेला आहे. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील यांच्या गटातील कॉंग्रेसचे नगरसेवक राषट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत.

सांगली जिल्ह्यातील राजकारणात दादा गट आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत शरद पवार यांनी खंजीर खुपसल्याच्या कहाण्या अजूनही येथे सांगितल्या जातात. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दलची प्रचंड चीड आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दबावातून कॉंग्रेसच्या नेत्यांनी सांगली विधानसभा मतदारसंघ स्वाभिमानीशी जोडला.

त्यामुळे दादा गटाचे कॉंग्रेसशी जमत नाही. विधानसभा निवडणुकीतही उमेदवारी देण्यास टाळाटाळ केल्याने दादा समर्थक कॉंग्रेसवर नाराज आहेत. त्यामुळे वसंंतदादा पाटील यांच्या नातसून जयश्री पाटील या काँग्रेसला रामराम करण्याच्या विचारात आहेत. पण विशेष म्हणजे ज्या शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्याशी नेहमीच उभा दावा मांडला त्यांच्याच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाण्याची तयारी सुरू आहे.

सांगली महापालिकेत काँग्रेसचे २० नगरसेवक आहेत. यापैकी पाटील गटाचे १२ नगरसेवक आहेत. माजी मंत्री पतंगराव कदम आणि मदन पाटील यांच्या निधनानंतर राज्यमंत्री विश्वजीत कदम यांच्याकडे जिल्ह्यातील काँग्रेसची धुरा आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी राजकारणापासून फारकत घेतली आहे, तर शहरात कदम गटाचा फारसा प्रभाव नसल्याने बहुतांश नगरसेवक जयश्री पाटील यांच्यासोबत आहेत. त्यांच्या निर्णयामुळे सांगलीतील काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती