शरद पवार माझाही कान धरतात,पार्थला बोलले ते योग्यच,भुजबळ यांचे पुन्हा स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी

नाशिक : नया है वो,असे सांगुन दोन दिवसांपुर्वी जेष्ठ नेते शरद पवार यांचे नातू आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याबाबत मार्मिक टिप्पणी करणारे नाशिकचे अपयशी पालकमंत्री छगन भुजबळ आज पुन्हा बडबडले. राष्ट्रवादी पक्ष हा एक परिवार असून शरद पवार हे कुटूंबप्रमुख आहेत. त्यामुळे परिवारात कुणी चुकलं तर बोलण्याचा व समजावम्याचा त्यांना अधिकार आहे. माझे काही चूकले तर ते माझाही कान धरतात असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, पवार यांचा पन्नास वर्षे राजकीय व आंतरराष्ट्रीय राजकारणाचा त्यांचा अभ्यास आहे. त्यामुळे पक्षात कुणी चुकलं तर त्यांना बोलण्याचा अघिकार आहे, त्यामुळे पार्थ पवारांना ते जे बोलले ते योग्यच असल्याचे त्यांनी सांगितले.राष्ट्रवादीत कोणतेही मतभेद नाहीत.

कुटुंबात आजोबांना नातवाला समजावण्याचा अधिकार असतो,त्याकडे भाजपमधील काही लोक संपर्कात आहेत. त्यांचे वडील व आजोबा हे मुळ कॉग्रेसी असून त्यांच्यावर कॉग्रेसचे संस्कार आहेत. त्यांच्या घरवापसीचा निर्णय हा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार घेतील. विरोधक टिका करत प्रसिध्दी मिळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

ज्योतिषी नसल्याचा राणेंना टोला

नारायण राणे यांनी हे सरकार तीन महिन्यात पडेल,अशी टिका केली होती, त्यावर हे सरकार पडेल की टिकेल हे सांगायला मी ज्योतिषी नाही,असा टोला भुजबळांनी लगावला. तसेच पद्मश्री पुरस्कारासाठी दोन समित्यांचे त्यांनी समर्थन केले असून या पुरस्कारासाठी अनेक दिग्गज असल्याचे ठाकरे समितीकडून आलेल्या नावाची दुसऱ्या समितीतील जेष्ठ सदस्यांकडून आणखी छाननी होईल, त्यात काही गैर नसल्याचे त्यांनी सांगितले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*