वैतागलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी वीज कार्यालयाला ठोकले कुलूप

विशेष प्रतिनिधी

नाशिक : अगोदरच लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नागरीकांना जादा वीजबीले आल्याने कंबरडे मोडले आहे. वीज मंडळाच्या कार्यालयात वारंवारं संपर्क साधून,निवेदने देऊनही तक्रारी ऐकण्यास कुणीही तयार नाही, राज्यभर हिच स्थिती दिसून येत आहे.

याचा निषेध करण्यासाठी उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख गाव असलेल्या साक्रीमध्ये वीज कंपनी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला मनसेच्या कार्यकर्त्यांनी टाळे ठोकले. अपयशी ठाकरे सरकारने वाढीव वीजबिलाप्रश्नी पर्याय काढला नाही तर राज्यभर आंदोलन करू,असा इशारा पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी दिला.

लॉकडाऊनच्या काळात वीज कंपनीने ग्राहकांना वाढीव वीजबिले माफ करावीत, अशी मागणी करणारी निवेदने सतरा जूनला मुख्यमंत्री,ऊर्जामं६यांना ई-मेल केली, मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही,मात्र वीज कंपनी अव्वाच्या सव्वा बिले देऊन ते बिल भरण्याची सक्ती करत आहे. ऊर्जामंत्री श्री.राऊत यांनी वीजबिलात २० ते ३० टक्के सूट देण्याबाबत विचार केला जात असल्याचे सांगितले होते.

मात्र प्रत्यक्षात काहीही झाले नाही. वाढीव वीजबिलाप्रश्नी राज्यातील तिकडी सरकार जनतेची दिशाभूल करत आहे,असा आरोप मनसेने केला. वीजबिलात त्वरीत सूट मिळावी व जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी मनसेने केली. मनसेचे जिल्हाध्यक्ष अँड.दुष्यंतराजे देशमुख, जिल्हा सचिव अजितसिंह राजपूत,संदीप जडे, महानगराध्यक्ष संजय सोनवणे,उपमहानगरप्रमुख संतोष मिस्त्री, राजेश दुसाने आदींनी हे आंदोलन केले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*