विशेष प्रतिनिधी
नाशिक : एरवी शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यावर फेरपार करावयाचा असल्यास तलाठी कार्यालयात अनेक चकरा माराव्या लागतात.अर्थपूर्ण चर्चा झाल्यावर नोंद टाकून मंजूर करून एक महिन्याने नोंद केली जाते देवगावच्या सखाराम राया वारे यांच्यासोबत एक अजबच प्रकार घडला आहे. त्यांची विहीर चोरीला गेली आहे.
एरवी शेतकऱ्यांना सातबारा उताऱ्यावर फेरफार करावयाचा असल्यास तलाठी कार्यालयात अनेक चकरा माराव्या लागतात. अर्थपूर्ण चर्चा झाल्यावर नोंद टाकून मंजूर करून एक महिन्याने नोंद केली जाते. देवगावच्या सखाराम राया वारे यांनी देवगाव शिवारातील गटनंबर २६७ वर विहीर नोंद करण्यासाठी कधीच अर्ज केला नाही.
तलाठ्यांची भेट घेतली नाही. चकरा मारून काम होत नाही. ते आपोआप कसे झाले. असा प्रश्न शेतकऱ्यांला पडला आहे. वारे यांना सातबाऱ्यावर विहीर आल्य़ाने त्यांना शासनाच्या अनुदानावर मिळणाऱ्या विहीर,पाइपलाइन योजनेचा लाभ घेता येत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विविध योजनांना मुकावं लागलं
देवगाव(ता.त्र्यंबकेश्वर) येथील शेतकऱ्यांने विहीर खोदली नाही,तरीही तलाठ्याने विहिरीची नोंद करून शेतकऱ्यांला अडचणीत आणले असून या नोंदीमुळे त्याला शासनाच्या विविध योजनांना मुकावे लागत आहे.
नोंदीमुळे शेतकरी अडचणीत
विहीर नोंदीसाठी मी अर्ज केला नाही, तलाठ्याला भेटलो नाही,उताऱ्यांवर विहिरींची नोंद आल्याने सासनाच्या अनुदानावर मिळणाऱ्या विहीर,पाइपलाइन योजनेचा लाभ घेत नसल्याने अडचणीत आलो आहे.