ल्युटीयन्स राजदीप यांना स्वत:चा अजेंडा चालवायचाय, पण मला त्यासाठी वेळी नाही, राहुल शिवशंकर यांचा पलटवार

नेक ल्युटीयन्स राजदीप यांना स्वत:चा अजेंडा चालवायचा आहे. मात्र, त्यांनी मला सल्ला देण्याची गरज नाही. त्यासाठी मला वेळही नाही. मी एक कर्मचारी असून करोडपती सल्लागार नाही. मला उपजिवीकेसाठी नोकरी करावीच लागणार आहे, अशा शब्दांत टाईम्स नाऊचे अ‍ॅँकर राहूल शिवशंकर यांनी राजदीप सरदेसाई आणि स्क्रोल या डाव्या विचारांच्या वेबसाईटला फटकारले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : अनेक ल्युटीयन्स राजदीप यांना स्वत:चा अजेंडा चालवायचा आहे. मात्र, त्यांनी मला सल्ला देण्याची गरज नाही. त्यासाठी मला वेळही नाही. मी एक कर्मचारी असून करोडपती सल्लागार नाही. मला उपजिवीकेसाठी नोकरी करावीच लागणार आहे, अशा शब्दांत टाईम्स नाऊचे अ‍ॅँकर राहुल शिवशंकर यांनी राजदीप सरदेसाई आणि स्क्रोल या डाव्या विचारांच्या वेबसाईटला फटकारले आहे.

टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणावर चर्चा सुरू ती भरकटवून भारताच्या जीडीपीचा मुद्दा मांडणाऱ्या वक्त्याला राहुल शिवशंकर यांनी थांबविले. एखाद्या विषयावर चर्चा सुरू असेल आणि वक्त्याने दुसरा विषय अनाहूतपणे काढला तर त्याला थांबविलेच जाते. परंतु, यावरून स्क्रोल-इन या वेबसाईटने एक लेख लिहिला.

तुमच्या अतिउत्साहाने देशाचा वेळ वाया घालवू नका, असे त्यामध्ये म्हणत राहुल शिवशंकर जीडीपीच्या मुद्यावर मुद्दामहून चर्चा होऊ देत नसल्याचे म्हटले आहे. याबाबत राजदीप सरदेसाई यांनीही ट्विट केले आहे. त्याला राहुल शिवशंकर यांनी ट्वीटद्वारेच उत्तर दिले आहे.

सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणातील ताज्या घडामोडींबाबत झालेल्या चर्चेत सुमंत रामन यांनी भारताच्या जीडीपीबाबत बोलायला सुरूवात केली. त्यामुळे राहुल यांनी त्यांना थांबविले. त्यावरून त्यांच्यावर टीका करण्यात आली.

यावरून राजदीप सरदेसाई यांच्यावरही टीका करण्यात येत आहे. सरदेसाई यांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील मुख्य संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिची मुलाखत घेतली. त्यासाठी ते चार्टर्ड विमानाने दिल्लीहून मुंबईला आले होते. परंतु, रियाच्या मुलाखतीतील अनेक त्रुटी प्रेक्षकांनीच दाखवून दिल्या.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*