राज्यपाल नियुक्त आमदारांची नावे पाठविण्यात मुख्यमंत्रीच अनुत्सूक, भगतसिंह कोश्यारी यांनी केले स्पष्ट

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांंच्यापासून अनेकांना महाविकास आघाडीने आमदारकीसाठी झुलवित ठेवले आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या निवडीत भगतसिंह कोश्यारी आडकाठी आणत असल्याचाही आरोप केला गेला. मात्र, या नियुक्तीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच खोडा घालत असल्याचे उघड झाले आहे. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे माझ्याकडे पाठविण्याची सरकारलाच घाई नाही तर मला कसली घाई? असे खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांंच्यापासून अनेकांना महाविकास आघाडीने आमदारकीसाठी झुलवित ठेवले आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या निवडीत भगतसिंह कोश्यारी आडकाठी आणण्यात असल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, या नियुक्तीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरेच खोडा घालत असल्याचे उघड झाले आहे. राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची नावे माझ्याकडे पाठविण्याची सरकारलाच घाई नाही तर मला कसली घाई? असे खुद्द राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे.

कोश्यारी यांच्या राज्यपाल पदाच्या कार्यकाळास एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल, ‘जनराज्यपाल भगतसिंह कोश्यारी’ या पुस्तकाचे प्रकाशन राजभवनात झाले. या समारंभानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना कोश्यारी म्हणाले, ‘जब मुद्दई सुस्त, गवाह चुस्त’ म्हणजेच फिर्यादीला (सरकार) घाई नसेल तर गवाह (साक्षीदार) चुस्त म्हणजे सक्रिय राहून काय फायदा. सरकार नावे पाठविण्याबाबत दिरंगाई करीत आहे. जे नावे पाठवत नाहीत त्यांचे आपण गुणगान कराल आणि राज्यपालांना शिव्या दिल्या तर ते चांगले वाटणार नाही.

आपल्या कार्यकाळात राजभवन विरुद्ध राज्य सरकार असे संघर्षाचे बरेच प्रसंग घडले याकडे आपण कसे बघता आणि त्यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न केला असता कोश्यारी म्हणाले की,असा काही संघर्ष आहे हे मी मानत नाही. भांड्याला भांड लागतंच हेही मी मानत नाही. राज्य सरकारच्या काही कमिटमेंट असतात आणि त्या पूर्ण करण्याचा सरकार प्रयत्न करीत असते. माझे सगळेच मित्र आहेत. विद्यापीठांच्या अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत आता निर्णय झालेला आहे, त्यावर वाद नाही.

देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून राजभवनवर सकाळी शपथविधी झाला होता. पत्रकारांकडून या बाबतचा प्रश्न साहजिकच विचारला गेला. त्यावर राज्यपाल हसत म्हणाले, ‘रामप्रहर खूप शुभ मानला जातो. रामप्रहरी झालेल्या त्या शपथविधीवर तुम्ही प्रहार कशाला करता.’ राज्यपालांच्या या टिप्पणीवर एकच हशा पिकला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्य शासनाच्या कारभारात राज्यपाल हस्तक्षेप करतात, अशी तक्रार मध्यंतरी केली होती या बाबत विचारले असता राज्यपाल म्हणाले की या दोघांपैकी जे माझ्यापेक्षा मोठे आहेत ते मला आदरणीय आहेत. जे लहान आहेत ते मला पितृतुल्य मानतात. रागात,आवेशात येऊन ते काही बोलले असतील. ‘मेरे दात मेरी जीभ को कांट दे तो मै दात तोड दुंगा क्या?

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*