राजीव गांधी फौंडेशनला देणग्या देणारी नररत्नं, भगौड्यांपासून ते देशद्रोहींपर्यंत

राजीव गांधी फौंडेशनला देणग्या देणाऱ्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार करून पळून जाणाऱ्या भगौड्यापासून ते देशाविरुध्द गरळ ओकणाऱ्या देशद्रोहींचा समावेश असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजीव गांधी फौंडेशनला देणग्या देणाऱ्यांमध्ये आर्थिक गैरव्यवहार करून पळून जाणाऱ्या भगौड्यापासून ते देशाविरुध्द गरळ ओकणाऱ्या देशद्रोहींचा समावेश असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला आहे.

संबित पात्रा पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, राजीव गांधी फाउंडेशनला आर्थिक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चौकसी याच्या कंपनीकडून देणग्या मिळत होत्या. झाकिर नाईक, एस बँकेचे राणा कपूर आणि जिग्नेश शाह यांनी देणग्या दिल्या. हे सर्व विविध घोटाळ्यांमध्ये आरोपी आहेत. राजीव गांधी फाउंडेशनला देणग्या मिळणे ही संयोगाची बाब नसून हा व्यवस्थित विचार करून केलेला कट आहे.

राजीव गांधी फौंडेशनची स्थापना १९९१ साली झाली आहे. देशासाठी एक थिंक टॅंक म्हणून काम करण्याचा त्याचा उद्देश होता. परंतु, कॉंग्रेसची एक संस्था म्हणूनच ती काम करत आहे. फाऊंडेशनच्या अध्यक्ष सोनिया गांधी आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, मॉंटेकसिंग अहलूवालिया, सुमन दुबे,राहूल गांधी, प्रियंका गांधी, हे कार्यकारी मंडळामध्ये आहेत. त्यामुळे या फाऊंडेशनला दिली जाणारी देणगी म्हणजे कॉंग्रेस पक्षाशी चांगले संबंध निर्माण करण्यासाठीची कृती असे समजले जाते.

पात्रा म्हणाले, मेहुल चोकसी याच्या नावावर गीतांजली हा ग्रुप आहे. या ग्रुप अंतर्गत मेसर्स नवीराज एस्टेट्स ही कंपनी येते. या कंपनीने २९ ऑगस्ट २०१४ मध्ये राजीव गांधी फाउंडेशनला धनादेश क्रमांक ६७६४०० च्या माध्यमातून १० लाख रुपयांची देणगी दिली. तसेच फाउंडेशनला एस बँकेकडून ९ लाख ४५ हजार रुपये मिळाले. हा राणा कपूर याचा पैसा नव्हता, मात्र हे पैसे एस बँकेतून राजीव गांधी फाउंडेशनकडे वळते करण्यात आले.

आर्थिक गैरव्यहारातीलच एक आरोपी असलेल्या जिग्नेश शहा यानेही राहुल गंधी फाउंडेशनला २७ ऑक्टोबर २०११ या दिवशी ५० लाख रुपयांची देणगी दिली, असे पात्रा यांनी म्हटले. जिग्नेश शाहने ५,६०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला.

इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या भारताविरुध्द परदेशात गरळ ओकणाऱ्या झाकिर नाईक याच्या फाउंडेशनने ८ जुलै २०११ ला राजीव गांधी फाउंडेशनला ५० लाख रुपयांची देणगी दिली. ज्या खात्यामार्फत ही देणगी देण्यात आली त्या खात्यावर अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जेव्हा पकडले गेले तेव्हा फाउंडेशनने आपला पैसा त्याच बँकेच्या दुसऱ्या खात्यावर वळते केले, असा आरोप पात्रा यांनी केला आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*