राजीव गांधी फाऊंडेशनला चीन्यांची देणगी कोणत्या अटींवर, रवीशंकर प्रसाद यांचा सवाल

राजीव गांधी फाउंडेशनला चीनने 2005-06 मध्ये तीन लाख डॉलरची (अंदाजे 2 कोटी 26 लाख रुपये)  देणगी दिली होती. त्यांनी हे पैसे कोणत्या अटींवर घेतले आणि त्या पैशांचे काय केले हे कॉंग्रेसने सांगावे, असा सवाल केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केल आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राजीव गांधी फाउंडेशनला चीनने 2005-06 मध्ये तीन लाख डॉलरची (अंदाजे 2 कोटी 26 लाख रुपये) देणगी दिली होती. त्यांनी हे पैसे कोणत्या अटींवर घेतले आणि त्या पैशांचे काय केले हे कॉंग्रेसने सांगावे, असा सवाल केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी केल आहे.

भारत आणि चीनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसकडून सातत्याने भारतीय जनता पक्ष आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका होत आहे. त्याला कडक शब्दांत उत्तर देताना रवीशंकर प्रसाद म्हणाले, काँग्रेसच्या कार्यकाळात चीनने आपल्या जमिनीवर कब्जा केला. काँग्रेसने सांगावे की, राजीव गांधी फाउंडेशनला हे रुपये चीनसोबत फ्री ट्रेड अ‍ॅग्रीमेंट (एफटीए) म्हणजेच, कोणत्याही अडथळ्याविना आयात-निर्यातीसाठी मिळाले आहेत. जेव्हा डोनेशन देण्याची सुरुवात झाली, तेव्हा राजीव गांधी फाउंडेशनने अनेक स्टडीजचा हवाला देत भारत आणि चीनमध्ये एफटीए किती गरजेचे आहे, हे पटवून दिले.

फॉरेन कांट्रीब्यूशन रेगुलेशन अ‍ॅक्टअंतर्गत कोणताही राजकीय पक्ष परदेशातून पैसे घेऊ शकत नाही. तसेच, कोणतीच एनजीओ सरकारच्या परवानगीशिवाय पैसे घेऊ शकत नाही. या डोनेशनसाठी सरकारकडून परवानगी घेतली होती का ? हे कॉंग्रेसने सांगावे. राजीव गांधी फाउंडेशन एजुकेशन अँड कल्चरल बॉडी नसून, एक पॉलिटिकल असोसिएशन आहे.

काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी या राजीव गांधी फाउंडेशनच्या अध्यक्षा आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी अर्थ मंत्री पी चिदंबरम आणि काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी बोर्डाचे सदस्य आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*