रशियन लस मिळविण्यासाठी पंतप्रधानांचा टास्क फोर्स

चीनी व्हायरसवर देशी लस शोधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने टास्क फोर्सच्या बैठका घेत आहेत. त्याचबरोबर देशातील जनतेला चीनी व्हायरसपासून दिलासा देण्यासाठी रशियन लस मिळविण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. रशियन लस मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उच्चाधिकार टास्क फोर्स (समिती) धोरण निश्चित करेल. रशियाचे अध्यक्ष व्हाल्दिमीर पुतीन यांनी त्यांच्या मुलीला रशियन व्हॅक्सीनचा डोस नुकताच दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसवर देशी लस शोधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने टास्क फोर्सच्या बैठका घेत आहेत. त्याचबरोबर देशातील जनतेला चीनी व्हायरसपासून दिलासा देण्यासाठी रशियन लस मिळविण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. रशियन लस मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उच्चाधिकार टास्क फोर्स (समिती) धोरण निश्चित करेल.

डॉ. व्ही. के. पॉल हे या टास्क फोर्सचे प्रमुख आहेत. अनेक सदस्य असलेल्या या समितीची बुधवारी बैठक झाली. रशियन लस स्पुटनिक-व्हीची गुणवत्ता किती याचा अहवाल पंतप्रधानांना देण्यासाठी चर्चा झाली. त्याचबरोबर ती लस किती प्रमाणात घ्यायची आणि त्यासाठीच्या निधीची व्यवस्था कशी असावी याबद्दलही विचारमंथन झाले. रशिया भारताचा मित्र देश आहे. त्यामुळे टास्क फोर्सला रशियन लशीबाबत तातडीने भूमिका घ्यायची आहे. या बैठकीस परराष्ट्र मंत्रालयातील सचिवही उपस्थित होते.

रशियन लस मिळविण्यासोबतच जगात वेगवेगळ्या ठिकाणी उत्पादन होत असलेल्या इतर अनेक कोविड लशीही मिळवण्याबाबतही प्रयत्न करण्यात येणार आहेत. तीन पाश्चिमात्य आणि दोन चिनी अशा पाच लशी उत्पादनाच्या प्रगतीच्या टप्प्यावर आहेत. हजारो लोकांवर या लशींची चाचणी घेतली जात असून त्या सगळ्या गुणवत्तेचा टप्पा ३ वर आहेत.

स्विडीश-ब्रिटिश औषध ग्रुप अ‍ॅस्ट्रा झेनिकासोबत काम करत असलेल्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीला येत्या सप्टेंबरअखेर निष्कर्ष मिळण्याची आशा आहे. यु. एस. नॅशनल इन्स्टिट्यूटस ऑफ हेल्थसोबत भागीदार असलेली अमेरिकेची बायोटेक कंपनी मोडेर्ना या वर्षअखेरचे लक्ष्य ठेवून आहे. जपानदेखील तीन पुरवठादारांशी वाटाघाटी करत आहे आणि ब्रिटनदेखील अशा उत्पादकांशी अशा प्रकारचे करार करत आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*