रथयात्रेला परवानगी दिली म्हणून मोहरम जुलूसचीही मागणी, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

जगन्नाथ पुरी येथे रथयात्रेला परवानगी दिलीत म्हणून आम्हाला मोहरमचे जुलूस काढून द्या म्हणणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यालयालयाने फटकारले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जगन्नाथ पुरी येथे रथयात्रेला परवानगी दिलीत म्हणून आम्हाला मोहरमचे जुलूस काढून द्या म्हणणाऱ्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यालयालयाने फटकारले आहे. पुरीत निश्चित ठिकाणांमध्ये रथ ओढण्याची बाब होती, धोक्याचा अंदाज होता. मात्र मोहरमचे जुलूस देशभर वेगवेगळ्या भागात निघू शकतात असे न्यायालयाने म्हटले आहे.

येत्या 30 ऑगस्टला मुस्लिम धर्मियांचा मोहरम सण आहे. उत्तर प्रदेशच्या सय्यद कल्बे जब्बाद यांनी मोहरमच्या दिवशी मिरवणूक (मातमी जुलूस) काढण्यास परवानगी मिळावी म्हणून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, देशात मोहरमच्या दिवशी मातमी जुलूस काढण्यावर बंदी घातली आहे.

आज या संदर्भात कोर्टात सुनावणी झाली. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांच्या खंडपीठाने म्हटले की, चीनी व्हायरसचा संसर्ग वाढलेला आहे. अशा परिस्थितीत लोकांचे आरोग्य धोक्यात टाकू शकत नाही. लखनऊमध्ये शिया समुदाय जास्त असल्याने याचिकाकर्त्याने मिरवणुकीसाठी (मातमी जुलूस) परवानगी मागितली. त्यांनी ओरिसाच्या जगन्नाथ पुरी येथे रथयात्रेला परवानगी दिल्याचा संदर्भ दिला होता.

सय्यद कल्बे जब्बाद यांच्या जगन्नाथ पुरीच्या हवाल्यावर सुप्रीम कोर्ट म्हणाले की, जगन्नाथ पुरीचे प्रकरण वेगळे होते, तिथे रथ एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी न्यायचा होता. अशा निश्चित जागेच्या प्रकरणांमध्ये आम्ही धोक्याचा अंदाज घेऊन आदेश देऊ शकतो. परंतु हा आदेश प्रत्येक बाबतीत दिला जाऊ शकत नाही. मिरवणुकीस (मातमी जुलूस) परवानगी दिल्यास गदारोळ होईल आणि एका विशिष्ट समुदायावर कोरोना पसरविल्याचा आरोप लावले जातील

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*