उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परिस्थितीचे गांभिर्य ओळखून पावले उचलली. त्यामुळे आज उत्तर प्रदेशमधील जनतेचा जीव वाचवला जात आहे, सर्व सुरक्षित आहेत. ३० लाखांहून अधिक स्थलांतरीत मजुरांची त्यांनी व्यवस्था केली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पावले उचलली. त्यामुळे आज उत्तर प्रदेशमधील जनतेचा जीव वाचवला जात आहे, सर्व सुरक्षित आहेत. ३० लाखांहून अधिक स्थलांतरीत मजुरांची त्यांनी व्यवस्था केली आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेश सरकारच्या आत्मनिर्भर यूपी रोजगार अभियानाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेल्या उद्घाटनात पंतप्रधानांनी योगींच्या कामाची प्रशंसा केली.
मोदी म्हणाले, संपूर्ण देशातून ३० लाखांहून अधिक स्थलांतरित मजूर, कामगार काही आठवड्यांपूर्वी परतले असताना ही उत्तर प्रदेशमधील चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलेला नाही. योगी आदित्यनाथ यांनी पूर्वीच्या सरकारांप्रमाणे काम केले नाही. योगींच्या सरकारने परिस्थितीचे गांभिर्य ओळखले. त्यांनी युद्ध पातळीवर काम केले. क्वारंटाईन सेंटर, आयसोलेशनच्या सोयी निर्माण करण्यासारख्या कामांसाठी त्यांनी पूर्ण शक्तीनिशी काम केले. ज्यांच्याकडे रेशन कार्ड नव्हते त्यांच्यासाठी यूपी सरकारने सरकारी रेशन दुकानांचे दरवाजे उघडे केले. इतकेच नाही, तर उत्तर प्रदेशातील सव्वा तीन कोटी गरीब महिलांच्या जनधन खात्यातही सुमारे ५ हजार कोटी रुपये थेट जमा केले.
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे उदाहरण देताना मोदी म्हणाले, १९५४ साली कुंभमेळ्यात भीषण चेंगराचेंगरी झाली होती. तो एक तो दिवस होता ज्या दिवशी अलाहाबादचे खासदार देशाचे पंतप्रधान होते आणि कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाली. त्यावेळी हजारो लोकांचे बळी गेले होते. त्या वेळी सरकारने मृ्त्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या लपवण्यावरच सर्व शक्ती खर्च केली होती.
मात्र आताच्या उत्तर प्रदेश सरकारने धोका पत्करून लाखो स्थलांतरित मजुरांना परत बोलावले. जर पुर्वीचे सरकार असते तर त्यांनी रुग्णालयांच्या संख्येवरून बहाणे सांगितले असते, असा दावा मोदींनी केला.