म्हणून दुखतंय विरोधकांचे पोट, प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजमधून 42 कोटीहून अधिक गरीबांंना 68 हजार 820 कोटी रुपयांची मदत

चीनी व्हायरसच्या संकटामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे सरकारने गरीबांना वाऱ्यावर सोडलेले नाही. गरीबांची पुरेपूर काळजी केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारने घेतली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजमधून 42 कोटीहून अधिक गरीबांंना 68 हजार 820 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या संकटामुळे कराव्या लागलेल्या लॉकडाऊनमुळे सरकारने गरीबांना वाऱ्यावर सोडलेले नाही. गरीबांची पुरेपूर काळजी केंद्रातील भारतीय जनता पक्ष सरकारने घेतली आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजमधून 42 कोटीहून अधिक गरीबांंना 68 हजार 820 कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. ही सगळी व्होटबॅँक आपल्या हातातून जाण्याच्या भीतीनेच विरोधकांची पोटदुखी सुरू झाली आहे. त्यामुळेच सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली जात आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेजचा भाग म्हणून केंद्र सरकारने महिला, गरीब ज्येष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांना 1.70 लाख कोटी रुपयाची मोफत अन्नधान्य आणि आर्थिक मदत जाहीर केली. या योजनेच्या जलदगती अंमलबजावणीवर केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने लक्ष ठेवून आहेत. पीएम-किसानच्या पहिल्या हप्त्यापोटी 8.94 कोटी लाभार्थींना 17 हजार 891 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले.

20.65 कोटी महिला जन धन खातेधारकांच्या खात्यात पहिला हप्ता म्हणून 10 हजार 325 कोटी जमा करण्यात आले. महिला जन धन खातेधारकांच्या खात्यात 10 हजार 312 कोटी रुपये जमा झाले. ज्येष्ठ नागरिक, विधवा आणि दिव्यांग अशा 2.81 कोटी लोकांना दोन हप्त्यात एकूण 2814.5 कोटी रुपये वितरीत करण्यात आले. 1.82 कोटी बांधकाम मजुरांना 4,987.18 कोटी रुपयांचे वित्तीय सहाय्य देण्यात आले.

प्रधानमंत्री उज्वला योजना (पीएमयुवाय) या योजनेअंतर्गत एकूण 8.52 कोटी सिलेंडरची एप्रिल आणि मे 2020 साठी नोंदणी करण्यात आली. त्यांचे वितरणही झाले. जून 2020 साठी 3.27 कोटी, जुलै 2020 साठी 1.05 कोटी, ऑगस्ट 2020 साठी 0.89 आणि सप्टेंबर 2020 साठी 0.15 कोटी सिलेंडरचे लाभार्थींना मोफत वितरण करण्यात आले. त्यामुळे लॉकडाऊनच्या संकटात हातात पैसे नसलेल्या महिलांना आधार मिळाला.

या काळात लोकांच्या हातात पैसे खेळते राहावेत यासाठी ईपीएफओच्या (भविष्य निर्वाह निधी) 36.05 लाख सदस्यांनी परत न करण्याचा एडव्हान्स म्हणून ईपीएफओ खात्यातून 9,543 कोटी रुपये ऑनलाईन रक्कम काढण्याचा लाभ घेतला. 24% ईपीएफ योगदान म्हणून 2476 कोटी रुपये ४३ लाख कर्मचाऱ्यांना हस्तांतरित करण्यात आले.

लॉकडाऊनमुळे अनेक प्रवासी मजुरांना त्यांच्या गावात परतावे लागले. त्यांना गावातच रोजगार मिळावा यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेतून कामे सुरू करण्यात आली. या योजनेसाठी 1 एप्रिल 2020 पासून वाढीव दर अधिसूचित करण्यात आले. या आर्थिक वर्षात 195.21 कोटी मानव दिवस कामाची निर्मिती करण्यात आली. मजुरी आणि साहित्य यांची प्रलंबित देणी चुकती करण्यासाठी 59,618 कोटी रुपये राज्यांना जारी करण्यात आले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*