- मोदींच्या भाषणात बकरी ईदचा उल्लेख नव्हता; ओवैसींची नाराजी
वृत्तसंस्था
हैदराबाद : अनलॉक २ ची घोषणा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधताना चीन ऐवजी नुसत्या चण्याचा उल्लेख केला. बकर ईदचा उल्लेख केला नाही म्हणून खा. असदुद्दीन ओवैसींना “पोटदुखी” झाली.
या भाषणात मोदींनी करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजना ते गरीबांना मोफत अन्नधान्य देण्याच्या सर्व योजनांबद्दल मोदींनी माहिती दिली. दरम्यान मोदींच्या या भाषणावर आता विरोधी पक्षातील नेत्यांच्या प्रतिक्रियाही येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेर पोस्ट करत मोदींना टोला लगावला.
यानंतर MIM पक्षाचे खासदार असद्दुदीन ओवेसी यांनीही मोदींच्या भाषणावर टीका केली आहे. पंतप्रधानांना आज चीनबद्दल बोलायचे होते पण ते बोलले चण्यावर. एका अर्थाने हे सुद्धा गरजेचे होते. कारण कोणताही विचार न करता लागू केलेल्या लॉकडाउनमुळे या देशातील अनेक गरिबांना अन्नाशिवाय दिवस काढावे लागले होते, अशा शब्दांत ओवैसींनी मोदींवर टीका केली आहे.
मोदींनी आपल्या भाषणात बकरी ईदचा उल्लेख न केल्यामुळेही ओवेसींनी मोदींवर टीकास्त्र सोडले. त्यांनी बकरी ईदचा उल्लेख टाळला असला तरी त्यांना ईद मुबारक असा टोलाही ओवैसींनी लगावला.