मॅडम सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचा खोटारडेपणाचा कारखाना सुरू असल्याची टीका भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे. राज्यांना जीएसटीचा वाटा न दिल्याने केंद्राने विश्वासघात केला आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी केला होता. त्याला दुबे यांनी उत्तर दिले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : मॅडम सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात कॉंग्रेसचा खोटारडेपणाचा कारखाना सुरू आहे, अशी टीका भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी केली आहे. राज्यांना जीएसटीचा वाटा न दिल्याने केंद्राने विश्वासघात केला असल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला होता. त्याला दुबे यांनी उत्तर दिले आहे.
दुबे म्हणाले, भाजपने कॉंग्रेसच्या १ लाख कोटी रुपयांची व्हॅटची वचनपूर्ती केलीय. जे २००९ ते २०१४ दरम्यान पूर्ण करण्यात काँग्रेस अपयशी ठरली होती. यामुळे निश्चिंत राहा आणि विश्वास ठेवा. जीएसटीबाबत राज्यांना दिलेले वचन भाजप पूर्ण करेल.
जीएसटीत राज्यांना वाटा देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. ‘प्राण जाये पर वचन ना जाए’ हेच त्यांचे तत्व आहे. तर ‘अपने झूठ से जानिए पराए दिल का हाल’, हा कॉंग्रेसचा नारा आहे. व्हॅटमधील १ लाख कोटी राज्यांना देण्याचे आश्वासन काँग्रेसने राज्यांना दिले होते. ते भाजपा सरकारने पूर्ण केले. लाज वाटली पाहिजे कॉंग्रेसला, असं दुबे म्हणाले.
गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात सातत्याने आरोप करत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर दुबे यांनी सोनिया गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.