मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला अमेरिकेत अटक; भारताच्या ताब्यात देणार


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर राणा याला अमेरिकेतील लॉस एन्जेलिसमध्ये अटक करण्यात आली आहे. राणाला मुंबई हल्ल्याशी संबंधित एका प्रकरणात १५ वर्षांची शिक्षा झाली होती.

अमेरिकेतही त्याला दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र, त्याची तब्येत खराब असल्याने मागील आठवड्यात लॉस एन्जेलिसच्या तुरुंगातून ठरलेल्या शिक्षेपेक्षा आधीच सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, दोन दिवसांनी त्याला पुन्हा ताब्यात घेण्यात आले.

तहव्वूर राणा मूळचा पाकिस्तानी नागरिक आहे. त्याच्याकडे सध्या कँनडाचे नागरिकत्व आहे. तहव्वूर राणाला सोडल्यानंतर दोनच दिवसात अटक करुन पुन्हा ताब्यात घेण्यात आले. आता त्याला भारताच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची शक्यता आहे.

भारताने मुंबई हल्ल्याप्रकरणी याआधीच अमेरिकेकडे प्रत्यार्पणाची मागणी केली होती. याबाबतचे प्रकरण अमेरिकेत अद्याप प्रलंबितच आहे. त्यामुळे अमेरिका राणाला भारताकडे सोपवण्याचा निर्णय घेऊ शकतो.

तहव्वूर राणा याने शिकागोमध्ये दहशतवादी गटांना पाठिंबा दिल्याप्रकरणी १० वर्षांची शिक्षा भोगली आहे. त्याची ही शिक्षा २०२१ पर्यंत होती. राणा हा मुंबईत हल्ला केल्याप्रकरणातील मुख्य सूत्रधार आहे. या हल्ल्यात जवळपास २३० लोकांना जीव गमवावे लागले होते. मुंबई हल्ल्यानंतर त्याला अमेरिकेतील लॉज एन्जेलिस येथे पकडण्यात आले होते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था