`मी पुन्हा येईन` हे लोकांना आवडलं का, याचा शोध घेतोय, खडसेंची फटकेबाजी

विशेष प्रतिनिधी

नाशिकः भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा उदय झाल्यापासून राजकीयदृष्टया अडगळीत गेलेले पक्षातील जेष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी ६९ व्या वाढदिवसानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आपली नाराजी पुन्हा एकदा बोलून दाखवली. सध्या आम्हाला अक्कल शिकवण्याचं जे काम सुरु आहे. त्याबद्दल मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. त्याचा स्फोट कधी होईल, हे सांगता येणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

मंत्रीपद गेल्यापासूनच खडसेंच्या मनात पक्षातून डावललं गेल्याची भावना आहे. ती नाराजी ते सातत्यानं बोलून दाखवत असतात. यावेळी मात्र त्यांनी फडणवीसांच्या एका घोषणेचाही उल्लेख केला.

प्रतिकूल परिस्थिती असतानाही एकेकाळी गोपीनाथ मुंडे,भाऊसाहेब फुंडकर,गडकरी,गिरीष बापट, मुनगंटीवरा आणि माझ्यासारख्या काही नेत्यांनी कष्टानं पक्ष उभारला होता. मागच्या वेळेस युती नसतानाही एकहाती सत्ता राज्यात मिळाली होती. आता केंद्रात सरकार असतांना, अनुकूल परिस्थिती असतांना सत्ता का गेली, असा प्रश्न त्यांनी केला. `मी येणार,मी पुन्हा येणार` मी पुन्हा येणार ही गोष्ट जनतेला आवडली नाही का?, की वेगळं काही कारण होते? याचा शोध मी घेतोय, असा टोला खडसेंनी फडणवीसांना लगावला.

ज्या कष्टानं आम्ही ह्या महाराष्ट्रात एकट्यांच्या बळावरर भाजपचं सरकार आणलं. त्या कालखंडात आताचे अनेक लोक नव्हते सुध्दा, मागच्या दहा ते बारा वर्षात हे जन्माला आले. राजकारणात चमकायला लागले आमि आमच्यासारख्याला अक्कल शिकवायला लागले. या सगळ्यांमुळं महाराष्ट्राच्या जनतेत आणि मला मानणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे. त्या संतापाचं एकत्रिकरण कधी होईल आणि त्याचा स्फोट कधी होईल हे सांगता येणार नाही. असा संतापही खडसे यांनी व्यक्त केला. करोनाचं संकट दूर झाल्यानंतर मी कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहे.यासाठी नेहमीप्रमाणे राज्यभरर दौरा करणारआहे. मला अनेक पक्षांकडून ऑफर होती,पण ज्या पक्षात चाळीस वर्षे निष्ठेने काढली. तो सोडून जावं,असं कदी वाटलं नाही,असंही ते म्हणाले.

भाजपला सत्तेत यायचं असेल तर

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये आणखी एक दिड वर्षे काही उलथापालथ होईल असं वाटत नाही. या आघाडीकडे आवश्यक ते संख्याबळ आहे. भाजपला सत्तेत यायचं असेल तर केवळ काही आमदार फोडून चालणार नाही. एखादा पक्षच सोबत घ्यावा लागेल. सध्याच्या परिस्थिती ती भाबडी आशा आहे, असं सांगुन सद्यातरी राज्यात भाजपला संधी नाही,असं अप्रत्यक्षपणे खडसेनी सांगुन टाकलं.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*