मी खरा नेहरूवादी, अध्यक्ष झाल्यास काँग्रेसची पुनर्बांधणी करेन ; संजय झा यांचा टोला

विशेष प्रतिनिधी

 

नवी दिल्ली : मी खरा नेहरूवादी आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष झालो तर पक्षाची पुनर्बांधणी करून भाजपचे आव्हान स्विकारण्यासाठी पक्षाला नक्कीच समर्थ बनवेन, असा टोला राष्ट्रीय प्रवक्तेवदावरून हकालपट्टी करण्यात आलेले काँग्रेस नेता संजय झा यांनी राहुल गांधी यांनी लगाविला आहे.

काँग्रेसचा माध्यमस्नेही आणि सोशलमिडीयाची  नेमकी जाण असलेल्या मोजक्य प्रवक्त्यांमध्ये संजय झा या समावेश होतो. ट्विटवरून आपल्या खुसखुशीच शैलीत झा काँग्रेस विरोधकांचा नेहमीच समाचार घेत असतात. मात्र, सध्या काँग्रेस पक्षच त्यांच्या रडारवर आल्याचे चित्र आहे.

त्याचे कारण म्हणजे काँग्रेसच्या स्थितीवर त्यांनी ठेवलेले बोट. काँग्रेस पक्षात अंतर्गत लोकशाही नाही आणि नेतृत्वाची कार्यशैलीही पक्षाला योग्य दिशा देऊ शकत नाही. त्यामुळे आता पक्षाची पुनर्बांधणी करण्याची वेळ आली आहे, असे म्हणत सोनिया गांधींवर त्यांनी थेट निशाणा साधला होता. त्यानंतर चीनी आगळिकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय परिपक्वता दाखविण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी राहुल गांधींवरही टिका केली होती. त्यानंतर संतप्त झालेल्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय प्रवक्तेपदावरून झा यांची तात्काळ हकालपट्टी करीत पक्षातली अंतर्गत लोकशाही अधोरेखित केली होती.

त्यानंतर शनिवारी झा यांनी पुन्हा एकदा गांधी कुटुंबावर टिका करणारे ट्विट केले आहे. ते म्हणाले, काँग्रेस कार्यसमितीची निवडणूक लवकरात लवकर होईल, अशी मला अपेक्षा आहे. निवडणूक घोषित झाल्यावर मी माझी उमेदवारी दाखल करणार आहे. कारण, पं. नेहरूंच्या विचारांचा खरा पाईक म्हणून पक्षाची पुनर्बांधणी करण्यास आणि भाजपचा सामना करण्यासाठी पक्षाला समर्थ बनविण्यास मी कटिबद्ध आहे.

झा यांचे हे ट्विट पाहता सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी – वाड्रा यांच्या पक्षावरील वर्चस्वास काँग्रेस नेते आता कंटाळले असल्याचे दिसून येते. मात्र, सध्या तरी त्यापैकी केवळ संजय झा यांनीच थेट टिका केली आहे. मात्र, आगामी काळात आणखी नेतेही स्पष्टपणे बोलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*