माझ्यात आणि तुकाराम मुंढेमध्ये आग लागणार नाही,आमचं काम पाणी देण्याचं,गुलाबराव पाटलांचे स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी

नाशिक : शिवसेनेच्या अंतर्गत वादाचा फायदा घेत आपला स्वार्थ साधणारे नेते म्हणून परिचित असणारे किंबहुना लावालावी करण्यात पटाईत असलेले पाणपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील राज्यात वादग्रस्त ठरत असलेल्या अधिकारी तुकाराम मुंढेबाबत बडबडले आहे.

तुकाराम मुंढे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव झाले असून पाणीपुरवठा विभागाचे गुलाबराव पाटील हे मंत्री आहे. दोघांची ओळख ही फायरब्रँन्ड असून एकाच विभागाचा कारभार त्यांच्याकडे आहे. त्यामुळे दोघात जमणार नाही असे चर्चा सुरु झाली. यावर चर्चा करणाऱ्यावर पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी स्पष्टीकरण देत उलट अनुभवाचा फायदा घेणार असे मत व्यक्त केले.

जळगावमध्ये गुलाबराव पाटील यांनी आपल्याच पक्षातील(शिवसेना) नेते आमदार चिमणराव पाटील यांना घरी बसून प्रश्न सोडविता येत नाही,जनतेत जाऊन प्रश्न समजून घ्यावे लागतात,असे सांगत वाद उभा केला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या दौऱ्यांवरही टिका केली होती, पाटील हे सतत काहीतरी बडबड करत आपण कसे वेगळे आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करतात.

शिस्तप्रिय अधिकारी व कठोर निर्णय म्हणून ओळखले जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूरच्या आयुक्तपदावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे., मंत्री पाटील यांच्याकडे पाणी पुरवठा व स्वच्छता खाते आहे. त्याच कात्याचे सचिव म्हणून मुंढेची नियुक्ती करण्यात आली आहे.

दोघाकडे पाणी देण्याचे खाते

दोघांकडेही खातं जनतेला पाणी देण्याचं आहे, आग लावण्याचे नव्हे, त्यामुळे अधिकारी तुकाराम मुंढे व माझ्यात आग लागलेच कशी? त्याच्या अनुभवाचा आपण फायदा करून घेणार आहोत,असे पाटील सांगत सुटले आहे. मुढे याची प्रशासकीय कारकीर्दे हे नेहमी वादग्रस्त असून पंधरा वर्षात त्यांच्या चौदा बदल्या झाल्या आहेत. नागपूर आयुक्तपदावरून आता जीवन प्राधिकरणात प्रकल्प व व्यवस्थापक सल्लागार म्हणून त्यांची बदली झालेली आहे. याच विभागाचे मंत्री शिवसेनेचे नेते पाटील आहेत. ते देखील स्वभावानेही फटकळ आणि आक्रमक आहेत. यामुळे दोघांमध्ये जोरदार संघर्ष होणार असे बोलले जात आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*