माजिद मेमन यांचे वावदूक ट्विट; सुशांत जिवंत असताना प्रसिद्ध नव्हता, तेवढा मरणानंतर प्रसिद्ध झालाय

  • मजिद यांच्या विधानाशी राष्ट्रवादीचा संबंध नाही; नवाब मलिकांनी झटकले हात

वृत्तसंस्था

मुंबई : सुशांत सिंह राजपूत जिवंतपणी जेवढा प्रसिद्ध नव्हता, तेवढा मृत्युनंतर प्रसिद्ध झालाय. त्याला अमेरिकेच्या अध्यक्षापेक्षा मीडियातून जास्त प्रसिद्धी मिळतीय, असे वावदूक ट्विट राष्ट्रवादीचे राज्यसभा खासदार माजिद मेमन यांनी केले.

सुशांतला भारताच्या पंतप्रधानांपेक्षा किंवा अमेरिकेच्या अध्यक्षापेक्षा जास्त प्रसिद्ध मिळतीय, असेही मेमन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्याला राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले.

 

माजिद मेमन यांचे विधान वैयक्तिक आहे. ते राष्ट्रवादीचे अधिकृत प्रवक्ते नाहीत. त्यांच्या विधानाचा राष्ट्रवादीशी संबंध नाही, असे सांगून नवाब मलिक यांनी हात झटकून टाकले.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*