महामारीतही बक्कळ कमाई, सरकारला पैसे द्या, सर्वोच्च न्यायालयाचे दूरसंचार कंपन्यांना आदेश


चीनी व्हायरसमुळे आलेल्या महामारीतही तुम्ही बक्कळ कमाई करत आहात. त्यामुळे या चीनी व्हायरसविरोधात लढण्यासाठी सरकारला पैसे द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने खासगी दूरसंचार कंन्यांना दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चीनी व्हायरसमुळे आलेल्या महामारीतही तुम्ही बक्कळ कमाई करत आहात. त्यामुळे या चीनी व्हायरसविरोधात लढण्यासाठी सरकारला पैसे द्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने खासगी दूरसंचार कंन्यांना दिला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठासमोर याबाबतची सुनावणी झाली. न्यायालयाने खासगी दूरसंचार कंपन्यांवर कडक ताशेरे ओढले. न्या. एम. आर. शहा यांनी सांगितले की, सरकारला या वेळी चीनी व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी पैशाची गरज आहे. खासगी दूरसंचार कंपन्यांनी काही रक्कम अवश्य जमा केली पाहिजे. केवळ दूरसंचार उद्योगच असा आहे की, जो महारोगराईच्या काळातही या कंपन्यांना मोठी कमाई करून देत आहे.

न्यायालयाने खासगी दूरसंचार कंपन्यांना १० वर्षांचे वहीखाते,वित्तीय देवाण-घेवाणीचे रेकॉर्ड सादर करण्यास सांगितले. थकबाकी म्हणून ३६ हजार ५०४ कोटी रुपयांचे देणे दिलेल्या टाटाकडून उपस्थित वकील अरविंद दातार म्हणाले, कंपनीने एजीआर थकबाकी म्हणून ३६ हजार ५०४ कोटी रुपयांचे देणे दिले आहे. दंड आणि व्याजाच्या तुलनेत परवाना शुल्क किरकोळ आहे.

व्होडाफोन-आयडियाकडून उपस्थित ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले, त्यांच्या कंपनीची वित्तीय स्थिती वाईट आहे. कंपनीला मार्च तिमाहीत नफा झाला नाही. कंपनीला १ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारकडे बँक हमीसाठी १५ हजार कोटी जमा आहेत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती