मध्य प्रदेश, राजस्थाननंतर आता पंजाबमध्ये कॉंग्रेस संकटात


कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे मध्य प्रदेशातील सरकार गेले. राजस्थान सरकार जाण्याच्या बेतात आहे. आता पंजाबमध्येही कॉंग्रेस संकटात सापडली असून मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या विरोधात काँग्रेसच्या दोन राज्यसभा सदस्यांनी मोर्चा उघडला आहे.


वृत्तसंस्था

अमृतसर : कॉंग्रेसमधील अंतर्गत गटबाजीमुळे मध्य प्रदेशातील सरकार गेले. राजस्थान सरकार जाण्याच्या बेतात आहे. आता पंजाबमध्येही कॉंग्रेस संकटात सापडली असून मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या विरोधात काँग्रेसच्या दोन राज्यसभा सदस्यांनी मोर्चा उघडला आहे.

अमरिंदरसिंग यांचा पक्ष संघटनेत प्रभाव असल्याचे मानले जात होते. त्यामुळेच नवज्योतसिंग सिध्दू यांच्यासारख्या लोकप्रिय नेत्यावर त्यांनी सहज कुरघोडी केली. मात्र, आता दोन नेत्यांनी त्यांना आव्हान दिले आहे. प्रतापसिंग बाजवा आणि शमशेर सिंग ढुलो यांनी थेट अमरिंदसिंग यांना हटविण्याची मागणी केली आहे.

बाजवा म्हणाले, राज्यातील पक्षाला वाचवायचे असल्यास अमरिंदर व प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष सुनील जाखड यांना पदावरून हटवले पाहिजे. पक्षश्रेष्ठींनी तसा निर्णय घेतला नाहीतर बंगालचे माजी मुख्यमंत्री सिद्धार्थ राय यांच्या संदर्नंभात झालेल्या घटनेची पंजाबमध्येही पुनरावृत्ती होऊ शकते. बंगालमध्ये सिध्दार्थ राय यांच्याविरुध्दच्या नाराजीची दखल घेतली गेली नसल्यामुळे कॉंग्रेस सुमारे चाळीस वर्षांपासून उखडली गेली आहे.

बाजवा आणि ढूला यांच्या आरोपांनंतर शिस्तपालन समिती योग्य तो निर्णय घेईल, असे प्रदेश प्रभारी आशा कुमारी यांनी स्पष्ट केले. ए.के. अँटोनी हे समितीचे अध्यक्ष आहेत. पंजाबमध्ये कॅबिनेट मंत्र्यांनी विषारी दारूच्या प्रकरणात राज्य सरकारवर टीका केल्यावरून गुरूवारी बाजवा व ढुलो यांची काँग्रेसमधून हकालपट्टीची मागणी केली होती.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती