मणिपूर सरकारसाठी अमित शहा संकटमोचक, नाराज आमदारांची समजूत

मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार बनविण्यात महत्वाचा वाटा असलेले गृह मंत्री अमित शहा या सरकारसाठी पुन्हा एकदा संकटमोचक बनले आहेत. शहा यांची भेट घेतल्यावर नॅशनल पिपल्स पार्टीच्या नाराज आमदारांची त्यांनी समजूत घातली आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांचे नेतृत्व कायम राहणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : मणिपूरमध्ये भारतीय जनता पक्षाचे सरकार बनविण्यात महत्वाचा वाटा असलेले गृह मंत्री अमित शहा या सरकारसाठी पुन्हा एकदा संकटमोचक बनले आहेत. शहा यांची भेट घेतल्यावर नॅशनल पिपल्स पार्टीच्या नाराज आमदारांची त्यांनी समजूत घातली आहे.

त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांचे नेतृत्व कायम राहणार आहे. नॅशनल पिपल्स पार्टीच्या चार आमदारांनी राज्यातील भाजपा सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा देत राजीनामा दिला होता.

हेमंत बिस्वा शर्मा यांनी या चार आमदारांची अमित शहा यांची भेट घडवून आणली. त्यावेळी या वेळी मेघालयाचे मुख्यमंत्री करनाड संगमा आणि मणिपूरचे उपमुख्यमंत्री वाई जॉय कुमार सिंह सोबत होते. त्यानंतर नाराज आमदारांची समजूत घालण्यात आली. त्याचबरोबर भाजपाच्या तीन बंडखोर आमदारांनीही पुन्हा पक्षावर विश्वास व्यक्त केला आहे. या तीन आमदारांनी नॅशनल पिपल्स पार्टीचे चार, तृणमूल कॉँग्रेसचा एक आणि एक अपक्ष आमदारासह राजीनामा दिला होता. त्यांनी सेक्युलर प्रोग्रेसिव्ह फ्रंट नावाने आघाडीही केली होती.

६० सदस्यीय मणिपूर विधानसभेत भाजपाचे १८ आणि सहयोगी पक्षांचे पाच सदस्य आहेत. या घडामोडींमुळे कॉंग्रेसला सत्तेची स्वप्ने पडू लागली होती. २० आमदार असलेल्या कॉंग्रेसने आपल्याला २९ आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले होते. परंतु, अमित शहा यांनी बोलणी करुन कॉंग्रेसच्या स्वप्नातील हवा काढून घेतली आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*