भ्रष्ट व कामचुकार सरकारी कर्मचाऱ्यांवर मोदी सरकार करणार कारवाई

सरकारी कार्यालयांना पडलेला बाबुगिरी, भ्रष्टाचार आणि कामचुकारपणाचा विळखा पूर्णपणे उखडून टाकण्यासाठी आता केंद्र सरकार मोहीम सुरू करणार आहे. भ्रष्ट व कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सरकार मोठी कारवाई करणार असून, त्यांना सेवा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच निवृत्ती दिली जाणार आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सरकारी कार्यालयांना पडलेला बाबुगिरी, भ्रष्टाचार आणि कामचुकारपणाचा विळखा पूर्णपणे उखडून टाकण्यासाठी आता केंद्र सरकार मोहीम सुरू करणार आहे. भ्रष्ट व कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर सरकार मोठी कारवाई करणार असून, त्यांना सेवा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच निवृत्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय कार्मिक मंत्रालयानं यासंदर्भात सर्व विभागांना आदेश दिले आहेत. ३० वर्ष सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांचा आढावा घेऊन भ्रष्ट व कामचुकार कर्मचाऱ्यांना जनहिताच्या दृष्टीनं आधीच त्यांना सेवानिवृत्त करण्यात यावं, असे आदेश केंद्र सरकारनं दिले आहेत.

हा आढावा घेताना अकार्यक्षम व भ्रष्टाचारी कर्मचाऱ्यांवरील आरोपांचीही चौकशी केली जाणार आहे. या चौकशीत जे कर्मचारी अकार्यक्षम व भ्रष्टाचारी असल्याचं सिद्ध होईल, त्यांना स्वेच्छा सेवानिवृत्ती घेण्यास सांगितलं जाणार आहे. याविषयी एक यादीही तयार करण्यात येणार आहेत.

३० वर्ष सेवा पूर्ण केलेल्या ५० ते ५५ वर्ष वय असलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवेचा आढावा घेतला जाणार आहे. सेवा कार्यकाळात झालेल्या अकार्यक्षम वा भ्रष्टाचाराचे आरोपांची चौकशी करण्यात यावी. कर्मचाऱ्यांच्या सेवा कार्यकाळाचा आढावा घेतल्यानंतर ते योग्य प्रकार काम करत आहेत की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. जर अपेक्षेप्रमाणे त्यांच्याकडून काम नसेल, तर जनहिताच्या दृष्टीनं त्यांना सेवेतून निवृत्त केलं जाणार आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*